घरताज्या घडामोडीदीपक केसरकरांकडून युतीबाबत शिक्कामोर्तब, म्हणाले जनतेने निवडून दिलेल्या...

दीपक केसरकरांकडून युतीबाबत शिक्कामोर्तब, म्हणाले जनतेने निवडून दिलेल्या…

Subscribe

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज भाजपसोबतच्या बैठकीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत. या बैठकीत मंत्रिपदाबाबतची चर्चा होणार आहे. मात्र, कोणत्याही पदाच्या आमिषापोटी एकनाथ शिंदे तिथे गेले नसून महाराष्ट्राच्या विकासासाठी निर्णय घेण्यासाठी गेले आहेत, असं दीपक केसरकर म्हणाले

महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलेल्या पक्षाची युती झाली. त्यामुळे संजय राऊतांनी (Sanjay Raut) पाठीत खंजीर खुपसला आहे असं बोलू नये, असं बंडखोर आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटलं आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांची पुढची रणनीती सांगितली. दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज भाजपसोबतच्या बैठकीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत. या बैठकीत मंत्रिपदाबाबतची चर्चा होणार आहे. मात्र, कोणत्याही पदाच्या आमिषापोटी एकनाथ शिंदे तिथे गेले नसून महाराष्ट्राच्या विकासासाठी निर्णय घेण्यासाठी गेले आहेत, असं दीपक केसरकर म्हणाले. (Deepak Kesarkar sealed the alliance, said the people elected …)

हेही वाचा – एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईच्या दिशेने रवाना; राज्यपालांची घेणार भेट

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारमधील बेबनाव उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आणून देण्यात आला होता. गेल्या दीड वर्षांपासून हे वाद त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तक्रारींची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर आम्ही बंड पुकारले. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या घटक पक्षाला दूर करण्याकरता हे बंड होतं. उद्धव ठाकरे यांना दुखवण्याचा आमचा हेतू नव्हता, असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं. तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात लढताना आम्हाला आमच्या नेत्याविरोधात लढावं लागलं याचं वाईट वाटतंय असंही दीपक केसरकर म्हणाले.

हेही वाचा  – एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईच्या दिशेने रवाना; राज्यपालांची घेणार भेट

- Advertisement -

महाराष्ट्राच्या जनतेने शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांना निवडून दिलं होतं. मात्र, त्यावेळी युती होऊ शकली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीसोबत जावं लागलं. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्या मतदारसंघातील लोकांना शिवसेनेविरोधात फिरवलं. तेथील दोन नंबरच्या खासदारकीच्या उमेदवाराला पुढचा उमेदवार म्हणून ओळख करून दिली. त्यामुळे याचा तोटा शिवेसनेला झाला असल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी केला आहे.

हेही वाचा – मंत्रिपदाच्या याद्या सोशल मीडियावर व्हायरल, एकनाथ शिंदे ट्विट करत म्हणाले…

दरम्यान, शिवसेनेतील हे बंड असले तरीही शिवसेनेतील एकही नेता ठाकरे कुटुंबियाला विरोध नाही. उद्धव ठाकरे आमचे कालही नेते होते, आजही आहेत. आमचा विरोध फक्त घटकपक्षाला होता. याविरोधात आम्ही वेळोवेळी पक्षप्रमुखाला सांगितले. मात्र, आमच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही म्हणून आम्हाला बंड पुकारावे लागले असं दीपक केसरकर यांनी म्हटलं.

एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना

एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाला असल्याचे माहिती दीपक केसरकर यांनी दिली. ते म्हणाले की, सत्ता स्थापनेसाठी आम्ही सर्व ५० आमदारांनी दोन तास चर्चा केली. या चर्चेत आम्ही एकनाथ शिंदे यांना सर्वाधिकार दिले आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही सर्वानुमते एकनाथ शिंदे यांना दिले आहेत, असं दीपक केसरकर म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -