घरताज्या घडामोडीमुंबईत गेल्यावर पुढची रणनीती सांगेन, एकनाथ शिंदेंची गुगली

मुंबईत गेल्यावर पुढची रणनीती सांगेन, एकनाथ शिंदेंची गुगली

Subscribe

शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गोव्याहून मुंबईच्या (Mumbai) दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईत दाखल झाल्यावर त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्राकडून 'झेड' दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

“शिवसेनेचा (Shiv sena) गटनेता म्हणून माझी निवड जाली आहे. ५० आमदारांनी मला हे अधिकार दिले. मुंबईत गेल्यावर पुढची रणनिती सांगीन. आम्हाला कोणालाही आनंद नाही. उद्धव ठाकरे यांच्याविषयी कालही आदर होता, आजही आहे”, असे गोवा विमानतळावर (Goa Airport) दाखल झाल्यावर एकनाथ शिंदे म्हणाले. (Eknath Shinde to meet governor in mumbai and share their next plan about maharashtra government)

गोवा विमानतळावर दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. त्यावेळी ते म्हणाले की, “मी आता मुंबईत जात आहे. मी मुंबईत (Mumbai) गेल्यावर बैठक होईल नवे सरकार कधी स्थापन होईल हे ठरेल. त्यानंतर आमची पुढची रणनीती काय आहे, हे सगळ्यासमोर येईल. मी देवेद्र फडणवीसांची ही भेट घेणार आहे.”

- Advertisement -

…तर आजही वेळ आली नसती : एकनाथ शिंदे

”आपल्या शिवसेनेच्या आमदाराच्या मतदारसंघामध्ये जे काही प्रश्न होते, अडचणी होत्या. त्यांना वाईट आणि चांगले अनुभव येत होते. यामधून आपण एक बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) हिंदूत्वाचा विचार पुढे घेऊन जाऊन अशी मागणी ५० आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्याचवेळी या आमदारांच्या मागणीबाबात निर्णय घेतला असता तर आज ही वेळ आली नसती. आम्हाला कोणालाही आनंद नाही. उद्धव ठाकरेंबाबत आमच्या मनामध्ये कालही आदर होता आणि आजही आहे”, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

केंद्राकडून ‘झेड’ दर्जाची सुरक्षा

शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गोव्याहून मुंबईच्या (Mumbai) दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईत दाखल झाल्यावर त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्राकडून ‘झेड’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

- Advertisement -

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांपैकी (Rebel MLA) केवळ एकनाथ शिंदेच गोव्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. शिंदे यांच्यासोबत आमदार रविंद्र चव्हाणही रवाना झाले आहेत. दुपारी १ ते २ वाजताच्या सुमारास एकनाथ शिंदे मुंबईत दाखल होणार असल्याचे म्हटले जात आहे. गोव्याच्या हॉटेलमध्ये शिंदे गटाची बैठक झाली आणि या बैठकीनंतरच एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.


हेही वाचा – विधानसभेत विरोधी पक्षनेते कोण? अजित पवार की जयंत पाटील?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -