घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घेणार पंतप्रधान मोदींची भेट, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत होणार चर्चा?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घेणार पंतप्रधान मोदींची भेट, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत होणार चर्चा?

Subscribe

शुक्रवारी मध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत सहा चर्चा झाल्यानंतर एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सखोल चर्चा होणार असल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.

नाट्यमय घडामोडींनंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) पहिल्यांदाच दिल्लीत दाखल झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत सहा चर्चा झाल्यानंतर एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सखोल चर्चा होणार असल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे. (CM Eknath Shinde will meet today to PM Narendra Modi)

हेही वाचा – शिंदे -फडणवीस यांची दिल्लीत अमित शहांसोबत मध्यरात्री खलबतं!

- Advertisement -

राज्यात सत्तांतर झाले असले तरीही मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही बाकी आहे. बंडखोरी केलेल्या आमदारांमध्ये काही मंत्रीही आहेत. तर, भाजपच्या आमदरांनाही चांगल्या खात्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कोणाला कोणतं खातं मिळणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, कालच अमित शहांसोबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीतही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. या भेटीत अमित शहांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. ट्विटरवर फोटो शेअर करताना अमित शाह म्हणाले, “महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. मला खात्री आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही दोघेही पूर्ण निष्ठेने जनतेची सेवा कराल आणि महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाल.

हेही वाचा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली अमित शाहांची भेट

- Advertisement -

एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांची देखील भेट घेणार आहेत. त्यानंतर ते थेट पुण्याला पोहोचून पुण्याहून पंढरपूरला जाणार आहेत. आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठूरायाची पूजा होते. या पूजेचा मान पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -