सोलापुरात भूकंपाचे धक्के, केंद्रबिंदू कर्नाटकात; जिल्हा प्रशासन सतर्क

भूकंपाचे केंद्रबिंदू सोलापूर जिल्ह्याच्या बाजूला असलेल्या कर्नाटक राज्यातीलर विजयपूर जिल्ह्यात आहे. ४.९ रिश्टल स्केलवर या भूकंपाची तीव्रता असल्यांच सांगण्यात आलं आहे.

Earthquake: Earthquake tremors felt from Jammu and Kashmir to Delhi

एकीकडे राज्यात अतिवृष्टीचा धोका असताना दुसरीकडे सोलापूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के (Mild earthquake) जाणवले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू (Earthquake center point) सोलापूर जिल्ह्याच्या बाजूला असलेल्या कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यात आहे. ४.९ रिश्टल स्केलवर या भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली आहे. (Mild earthquake in solapur)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अतिमुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच, आज सकाळी सोलापूर जिल्ह्यातील रामवाडी परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. सुरुवातीला नेमकं काय घडतंय हे कोणालाच कळलं नाही. दरम्यान, भूकंपामुळे कुठे वित्त वा जीवितहानी झाली आहे का याची जिल्हा प्रशासनाकडून तपासणी सुरू आहे.

हेही वाचा – अंदमान-निकोबार बेट भूकंपाने हादरले, तीव्रता ५ रिश्टर स्केल

कर्नाटकात केंद्रबिंदू

सोलापूरपासून काही अंतरावर असलेल्या कर्नाटक राज्यात विजयपूर येथे भूकंपाचे केंद्रबिंदू आहे. त्या ठिकाणी 4.9 रिस्टर स्केल भूकंप झाल्याची नोंद झाली आहे.

भूकंप का होतात जाणून घ्या?

पृथ्वी प्रामुख्याने चार थरांनी बनलेली आहे. आतील गाभा, बाह्य गाभा, आवरण आणि कवच. कवच आणि वरच्या आवरणाच्या गाभ्याला लिथोस्फीअर म्हणतात. हा 50 किमी जाडीचा थर टेक्टोनिक प्लेट्स नावाच्या अनेक विभागांमध्ये विभागलेला आहे. या टेक्टोनिक प्लेट्स त्यांच्या जागी कंपन करत राहतात आणि जेव्हा ही प्लेट खूप कंपन करते तेव्हा भूकंप जाणवतो.

हेही वाचा – अफगाणिस्तानातील भूकंपात मृतांचा आकडा 1 हजाराच्या वर

भूकंपाचा केंद्रबिंदू आणि तीव्रता याचा अर्थ काय आहे हे जाणून घ्या?

भूकंपाचा केंद्रबिंदू हे ठिकाण आहे ज्याच्या खाली प्लेट्सच्या हालचालीमुळे पृथ्वी थरथरू लागते. या ठिकाणी किंवा आसपासच्या भागात भूकंपाचा प्रभाव अधिक असतो. जर रिश्टर स्केलवर 7 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप झाला, तर आजूबाजूच्या 40 किमीच्या त्रिज्येत हा हादरा अधिक तीव्र असतो.