घरमहाराष्ट्रनाशिकउद्या शिर्डीमध्ये भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती; साई संस्थानाच्या वतीने निमंत्रण पत्रिका

उद्या शिर्डीमध्ये भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती; साई संस्थानाच्या वतीने निमंत्रण पत्रिका

Subscribe

यंदा शिर्डीमध्ये १२ जुलै ते १४ जुलै या दिवसांत गुरू पौर्णिमेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे

हिंदू धर्मात गुरू पौर्णिमेला अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते. असं म्हणतात की, पृथ्वीवर गुरू ईश्वरासमान असतो. या दिवशी आपल्या गुरूची सेवा करण्याची परंपरा आहे. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरू पौर्णिमा साजरी केली जाते.धार्मिक मान्यतेनुसार, आषाढ पौर्णिमेच्या दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला होता आणि शास्त्रात वेदव्यासांना भगवान श्री गणेशाचे गुरू मानले आहे.तसेच व्यास ऋषींनी १८ पुराणांची रचना केली त्यामुळे वेदव्यास ऋषी यांचा जन्मदिवस गुरू पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या वर्षी १३ जुलै रोजी गुरू पौर्णिमा असणार आहे.

या दिवशी संपूर्ण भारतात भाविक आपल्या गुरूंची उपासना करतात त्यांच्या तीर्थ क्षेत्रांना भेट देतात. गुरू पौर्णिमेला साई भक्त देखील कोरोनाच्या दोन वर्षाच्या मोठ्या ब्रेकनंतर शिर्डीमध्ये मोठ्या संख्येत दाखल होणार आहेत. येथील साई बाबा संस्थानाने गुरू पौर्णिमेची जय्यत तयारी सुरू केली आहे. यंदा शिर्डीमध्ये १२ जुलै ते १४ जुलै या दिवसांत गुरू पौर्णिमेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. शिर्डी संस्थानाच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर संस्थानाच्या वतीने उत्सवाची निमंत्रण पत्रिका जाहीर करण्यात आली आहे.


हेही वाचा :गुरू पौर्णिमा 2022 : भाग्योदयासाठी करा ‘या’ गोष्टींचे दान

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -