घरताज्या घडामोडी... म्हणून संजय राऊतांवर सर्वांचा राग, उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं

… म्हणून संजय राऊतांवर सर्वांचा राग, उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं

Subscribe

संजय राऊतांवर कोणाचा राग नसून त्यांनी गेल्या काही दिवसांत जी वक्तव्ये केली आहेत त्याचा परिपाक म्हणून शिवसैनिकांचा राग आहे, असं उदय सामंत म्हणाले. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

शिवसेनेतील नाराजी चव्हाट्यावर आल्यानंतर संजय राऊतांवर अनेक बंडखोर आमदारांचा रोष होता. यावरून संजय राऊतांवर सर्व बंडखोर आमदार का भडकले आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला. आता याबाबत माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी खुलासा केला आहे. संजय राऊतांवर कोणाचा राग नसून त्यांनी गेल्या काही दिवसांत जी वक्तव्ये केली आहेत त्याचा परिपाक म्हणून शिवसैनिकांचा राग आहे, असं उदय सामंत म्हणाले. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. (why everyone angry on sanjay raut, uday samant clarified)

हेही वाचा – नारायण राणेंच्या बंडाला शरद पवारांची फूस, दीपक केसरकरांचा दावा

- Advertisement -

बंडखोर आमदारांना डुक्कर म्हटलं गेलं, मुंबईच्या गटारातील घाण असल्याचं म्हटलं गेलं. अनेक शब्दप्रयोग झाले. पण तरीही संजय राऊत हे शिवसेनेचे नेत नाहीत असं कोणी म्हटलेलं नाही. किंवा कोणीही त्यांच्याविरोधात अनादर दाखवलेला नाही. त्यांच्या वक्तव्यावरून आमदार दुखावले गेल्याने या आमदारांनी राऊतांवर रोष ठेवला, असं उदय सामंत म्हणाले.

हेही वाचा – बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच मी आज मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंनी केले शिवसेनाप्रमुखांना स्मरण

- Advertisement -

या मुलाखतीत त्यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुकही केलं आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीत असताना अडीच वर्षांत माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आल्या. माझ्याकडे कोल्हापूर, साताऱ्याची जबाबदारी होती. मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. रत्नागिरीतून निवडून आलो होतो. यातील एकही जबाबदारी मी नाकारली नाही. कोकणात नारायण राणेंसोबत माझा सामना चालायचा. तरीही कोणाकडे तक्रार केली नाही. एवढा सगळा अन्याय झाला. हे सगळं झाल्यानंतर आमच्या व्यथा मांडण्यासाठी एकनाथ शिंदे हेच विंडो होते. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे आमच्या व्यथा मांडल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -