घरमहाराष्ट्रअमरावतीत इमारत कोसळली, पण सुदैवाने जीवितहानी नाही

अमरावतीत इमारत कोसळली, पण सुदैवाने जीवितहानी नाही

Subscribe

बाब तेथील सतर्क व्यापाऱ्यांच्या लक्षात आली. इमारत पूर्णपणे कोसळण्या पूर्वीच इमारतीखाली असलेल्या दुकानांमधील व्यापारी वेळेच्या आधीच इमारती बाहेर पडले आणि जीवितहानी टळली.

अमरावतीच्या(amravati) गांधी चौकात(gandhi chauk) इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. ही इमारत दुमजली होती. हीच इमारत मागील काही दिवसांपासून धोकादायक बनली होती. या आधी या इमारतीचा काही भाग सुद्धा कोसळला होता. ही बाब तेथील सतर्क व्यापाऱ्यांच्या लक्षात आली. इमारत पूर्णपणे कोसळण्या पूर्वीच इमारतीखाली असलेल्या दुकानांमधील व्यापारी वेळेच्या आधीच इमारती बाहेर पडले आणि जीवितहानी टळली.

हे ही वाचा – कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प, चिपळूणजवळ दरड कोसळली; प्रवाशांचा खोळंबा

- Advertisement -

अमरावतीच्या गांधी चौकात(amravati, gandhi chauk) इमारत कोसळलयाची घटना घडली. इलेक्ट्रिकचे दुकान आणि दूध शेअरी यामध्ये जमीन दोस्त झाले. पण सुदैवाने या मध्ये कोणतीच जीवितहानी झाली नाही. पण ही इमारत कोसळतानाची दृश्ये कॅमेरात कैद झाली. पाट्यांचा बंगला कोसळावा त्याप्रमाणे ही इमारत कोसळली. ही इमारत ३५- ४० वर्षे जुनी आहे. ही इमारत कोसळण्यापूर्वी अवघी दहा मिनिटे आधीच इमारतीतील व्यावसायिक इमारती बाहेर आले होते. त्याच दरम्यान पाऊस सुद्धा कोसळत होता. ही इमारत ज्या रस्त्यालगत होती तो रस्ताही वर्दळीचा होता. त्यामुळे या दुर्घटनेचा अंदाज घेता सतर्क नागरिकांनी आधीच हा रस्ताही वाहतुकीसाठी बंद केला होता.

हे ही वाचा – ठाकरे सरकारला जमलं नाही ते शिंदे सरकारने केलं, नवनीत राणांची टोलेबाजी

- Advertisement -

इमारत धोकादायक बनली होती

हे ही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या गावात हेलिपॅड आहेत, पण शाळा नाही… उच्च न्यायालयाची टिप्पणी

ही इमारत मागील काही दिवसांपासूनच धोकादायक बनली होती. आधीही या इमारतीचा काही भाग कोसळला होता. त्याचबरोबर रस्त्यालगतची वाहने सुद्धा हलविण्यात आली होती. या इमारतीत दुकानांसोबतच वरच्या मजल्यावर एक कुटुंब सुद्धा राहत होते. सुरुवातीला इमारतीला हादरे बसण्यास सुरुवात झाली आणि त्याचसोबत पुढचा धोका लक्षात घेता. सर्वजण इमारतीमधून बाहेर पडले. त्यामुळे पुढे होणारा जीवितहानीचा धोका टाळला.

हे ही वाचा – जाणून घ्या; धरण पूर्ण भरलेलं नसेल तरी का केला जातो पाण्याचा विसर्ग…

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -