घरदेश-विदेशमुंबईचा मीत शहा सीएच्या परीक्षेत देशात अव्वल

मुंबईचा मीत शहा सीएच्या परीक्षेत देशात अव्वल

Subscribe

मुंबईच्या मीत शहाने(MEET SHAHA) ८०. २५ ५टक्के मिळवून देशात पहिला क्रमांक मिळवला, तर दोन्ही ग्रुपच्या परीक्षेचा निकाल २१. ९९ टक्के इतका लागला. आयसीएआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने म्हणजेच (सीए) सनदी लेखापाल(CA) अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. त्यात मुंबईच्या मीत शहाने(MEET SHAHA) ८०. २५ ५टक्के मिळवून देशात पहिला क्रमांक मिळवला, तर दोन्ही ग्रुपच्या परीक्षेचा निकाल २१. ९९ टक्के इतका लागला.
आयसीएआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

हे ही वाचा – डिजिटल मीडियासाठी देशात येणार नवा कायदा, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून प्रक्रिया सुरू

- Advertisement -

सीएची अंतिम परीक्षा मे महिन्यात घेण्यात आली होती. ग्रुप एकचा निकाल २१. ९९ टक्के लागला. त्यात परीक्षा दिलेल्या ६६ हजार ५७५ विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ६४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ग्रुप दोनचा निकाल २१. ९४ टक्के निकाल लागला. परीक्षा दिलेल्या ६३ हजार२५३ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ८७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दोन्ही ग्रुपची परीक्षा दिलेल्या २९ हजार ३४८ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ६९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेत जयपूरच्या अक्षत गोयलने ७९. ८८ टक्के गुण मिळवून देशात डवूहीतीय क्रमांक पटकावला. तर सुरतच्या सृष्टी सांघवीने ७६. ३८ गुणांसह देशात तृतीय क्रमांक मिळवला.

हे ही वाचा – वेळेच्या एक तास आधीच न्यायालयीन कामकाजाला सुरुवात, न्यायाधीशांसमोर ठेवला अनोखा आदर्श

- Advertisement -

चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याचे ध्येय –

”देशात पाहिलं येणं हे अनपेक्षित आहे. त्यामुळे खूपच आनंद झाला. रोज ठराविक तास अभ्यास करण्यापेक्षा एकाग्रतातेने अभ्यास करण्यावर भर दिला होता. खाजगी शिकवणी सोबतच स्वतःहुनही अभ्यास करण्यावर भर दिला होता. आता पुढे जाऊन खासजि क्षेत्रात काम करायचं की स्वतःचा व्यवसाय करायचा याचा विचार करतो आहे.” असं म्हणत मीत शहाने परिक्षेच्या निकालानंतर आनंद व्यक्त करत प्रतिक्रीया दिली.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -