घरताज्या घडामोडीशिंदे गटातील ३ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश, नाईकांचा मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का

शिंदे गटातील ३ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश, नाईकांचा मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेत मोठी उभी फूट पाडली आहे. शिंदे गटामध्ये आमदार आणि खासदारांचं इन्कमिंग सुरू आहे. आमदार, महापौर यांच्यासह अनेक नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या शहरातील नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. मात्र, अशातच भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे.

शिंदे गटातील ३ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते हे पुन्हा एकदा भाजपमध्ये दाखल झाले आहे. आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत गवते यांनी पक्ष प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश नसून घरवापसी असल्याचं भाजप आमदार गणेश नाईक यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

डिसेंबर २०२१ मध्ये नवी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादीत भाजपच्या नगरसेवकांनी रांग लावली होती. भाजपचे जवळपास १४ नगरसेवक आणि नगरसेविका यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. त्यानंतर ते शिवसेना आणि राष्ट्रवादीत दाखल झाले होते. नवी मुंबईतील भाजपचे तीन नगरसेवक माजी नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते, दीपा गवते हे शिवसेनेचे दाखल झाले होते. मात्र, आता राज्यात शिंदे गट आणि भाजपचं सरकार आल्यानंतर या तिन्ही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेना नेमकी कोणती?, यावरून सत्तासंघर्ष आणि वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे एकीकडे शिवसेनेत फूट पडली असून दुसरीकडे काही नगरसेवकांची भाजपात एन्ट्री होताना दिसत आहे. त्यामुळे हा शिंदे गटाला पहिला धक्का बसला असून शिंदे गटातील काही आमदार, खासदार आणि नगरसेवक हे भाजपच्या वाटेवर आहेत का?, असा देखील प्रश्न येथे उपस्थित होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी, शिवसेनेला


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -