घरमनोरंजनइमर्जन्सी चित्रपटावर काँग्रेसचा आक्षेप, कंगनासमोर ठेवली ही अट

इमर्जन्सी चित्रपटावर काँग्रेसचा आक्षेप, कंगनासमोर ठेवली ही अट

Subscribe

सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरूनच कंगना इंदिरा गांधी यांची प्रतिमा मालिन करीत आहे.

हिंदी चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेत्री कंगना राणावत सतत चर्चेत असते. कंगनाचा धाकड हा चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर कंगनाने तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘इमर्जन्सी’ हा कंगनाचा आगामी चित्रपट आहे हा चित्रपट आणि कंगना सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.कंगनाचा इमर्जन्सी हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे दिसते आहे. या चित्रपटावर आता काँग्रेसने सुद्धा आक्षेप घेतला आहे. याचसोबत काँग्रेस कडून कंगना समोर एक मोठी अट सुद्धा ठेवण्यात आली आहे. आता या सगळ्यावर कंगना काय बोलणार ते महत्वाचं.

हे ही वाचा – इंदिरा गांधींच्या भूमिकेत कंगनाचा जबरदस्त लूक; ‘इमरजेंसी’चा टीझर रिलीज

- Advertisement -

इमर्जन्सी या आगामी चित्रपटात अभिनेत्री कंगना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसते आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९७५ ते १९७७ दरम्यान देशात आणीबाणी (इमर्जन्सी) लागू करण्यात आली होती. याच इमर्जन्सीची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. दरम्यान मध्य प्रदेश मध्ये काँग्रेस पक्षाकडून कंगनाच्या या चित्रपटावर आक्षेप दर्शविण्यात आला आहे. इमर्जन्सी या चित्रपटातून इंदिरा गांधी यांची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे असं सांगण्यात आलं आहे. मध्य प्रदेश काँग्रेस कसून असे सांगण्यात आले आहे की इमर्जन्सी चित्रपट आधी आम्हाला दाखविण्यात यावा. त्याचबरोबर मध्य प्रदेशच्या काँग्रेस मीडिया विभागाच्या उपाध्यक्षा संगीत वर्मा सुद्धा म्हणाल्या की ”कंगना ही भाजपची एजंट आहे. आणि सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरूनच कंगना इंदिरा गांधी यांची प्रतिमा मालिन करीत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

- Advertisement -

हे ही वाचा – राणादा-पाठकबाईंकडून चाहत्यांना सरप्राईज; लवकरच झळकणार ‘या’ चित्रपटात

दरम्यान देशातील सर्वात शक्तीशाली महिला असलेल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. कंगनाने नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. कंगना रनौत नेहमीच तिच्या अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकत असते. गेल्या अनेक दिवसापासून तिचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. इंदिरा गांधी यांच्यावर आधारित या चित्रपटाचं नाव ‘इमरजेंसी’ असून नुकताच कंगनाने या चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या टीझरखाली कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय की, ‘Her’ who was called ‘Sir’ असं लिहिलं आहे. तसेच या टीझरमध्ये इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणारी कंगना रनौत अमेरिकाच्या राष्ट्रपतींना एक मॅसेज द्यायला सांगते की, त्यांच्या कार्यालयात त्यांना कोणी मॅडम नाही ‘सर’ म्हटलं जातं.” या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं आहे.

Kangana

हे ही वाचा –  भारतीय पुरुषांनी प्रेम दिले पण महिलांनी…; मल्लिका शेरावतने व्यक्त केली खदखद

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -