घरताज्या घडामोडीविनायक राऊतांच्या बोलण्यात तथ्य नाही, राहुल शेवाळेंचा पलटवार

विनायक राऊतांच्या बोलण्यात तथ्य नाही, राहुल शेवाळेंचा पलटवार

Subscribe

ज्या कायदेशीर पूर्तता आहेत, त्या १८ जुलै मी पूर्ण केल्या आहेत. परंतु प्रसिद्धी पत्रक हे १९ जुलै रोजी काढण्यात आलं. चिराग पासवान यांच्या केससंदर्भात आताच निकाल लागला आहे. त्याच केसमध्ये ज्यादिवशी त्यांनी सबमिशन केलं. त्यादिवशी त्यांच्या काकांची गटनेता म्हणून नियुक्ती झाली आहे. हे एक उदाहरण आपल्याला दिसून येत आहे. खासदार विनायक राऊत जे बोलत आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाहीये, असा पलटवार शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर केला आहे.

विनायक राऊतांच्या बोलण्यात तथ्य नाही

विनायक राऊतांनी केलल्या आरोपानुसार ११ तारखेला अंमलबजावणी झाली आणि १९ तारखेला पत्र दिलं, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता राहुल शेवाळे म्हणाले की, ज्या कायदेशीर पूर्तता आहेत, त्या १८ जुलै मी पूर्ण केल्या आहेत. परंतु प्रसिद्धी पत्रक हे १९ रोजी काढण्यात आलं. चिराग पासवान यांच्या केससंदर्भात आताच निकाल लागला आहे. त्याच केसमध्ये ज्यादिवशी त्यांनी सबमिशन केलं. त्यादिवशी त्यांच्या काकांची गटनेता म्हणून नियुक्ती झाली आहे. हे एक उदाहरण आपल्याला दिसून येत आहे. खासदार विनायक राऊत जे बोलत आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाहीये. सुप्रीम कोर्टात सुद्धा या गोष्टीचा टिकाव लागणार नाही.

- Advertisement -

१८ जुलै आणि १९ जुलै अशा प्रकारचा कोणताही वाद यामध्ये नाहीये. लोकसभेच्या अध्यक्षांनी सगळ्या गोष्टींची कायदेशीर पूर्तता केली आहे. चिराग पासवान यांनी सुद्धा अशाच प्रकारे कायदेशीर पूर्तता केली होती. २०१४ आणि २०१९ रोजी आम्ही युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली आहे. शिवसेना-भाजपा युतीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवली. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि मोदींचे नेतृत्व यामुळे जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला. तसेच २०१९ मध्येही लोकांनी आमच्यार विश्वास ठेवला. त्यामुळे २०१९ मध्ये जे काही आम्ही केलं. तेच आम्ही २०२४ साठी करत आहोत. शिवसेना-भाजपा युतीच्या जोरावरच आम्ही २०२४ रोजी जनतेसमोर लोकांचे आशीर्वाद मागायला जाणार आहोत, असं राहुल शेवाळे म्हणाले.

विनायक राऊतांचा आरोप काय?

शिवसेनेच्या बंडखोर गटाने १९ जुलैला त्यांच्या गटनेतेपदाबाबत मागणी केली होती, मात्र लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी १८ जुलैलाच हा निर्णय घेतला. त्यामुळे बंडखोरांना निवडण्याचा निर्णय आधीच झाला होता, असा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -

आम्ही ६ जुलै रोजी लोकसभा अध्यक्ष आणि संसदीय कामकाज मंत्र्यांना पत्र दिलं होतं. त्यानंतर १८ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता लोकसभा अध्यक्षांच्या घरी जाऊन शिवसेनेच्या गटनेतेपदावर कुणी दावा केल्यास आम्हाला आमचं म्हणणं मांडण्याची संधी द्या, अशी मागणी केली होती. त्यानंतर १९ जुलै रोजी लोकसभा अध्यक्षांना भेटून पत्र सुद्धा दिलं होतं. मात्र, त्यांनी आमच्या पत्राची दखल न घेता लोकसभेतील शिवसेना गटनेते बदलले आहेत, असं राऊत म्हणाले होते.


हेही वाचा : सुहास कांदेंची नक्कीच भेट घेईन; बंडखोर आमदाराच्या आव्हानाला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -