घरदेश-विदेशकर्नाटकात भाजपच्या युवा नेत्यानंतर आणखी एका २३ वर्षीय तरुणाची हत्या; कलम १४४...

कर्नाटकात भाजपच्या युवा नेत्यानंतर आणखी एका २३ वर्षीय तरुणाची हत्या; कलम १४४ लागू

Subscribe

'गुरुवारी २८ जुलै रोजी रात्री ८ च्या सुमारास एका २३ वर्षीय तरुणावर चार ते पाच अज्ञातांनी हल्ला केला. प्रवीण नेत्तर यांच्या हत्तेनंतर पुन्हा घडलेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि कलम १४४ लागू केले आहे.

कर्नाटकातील(karnataka) मंगळुर जिल्यात एक २३ वर्षीय तरुणाची गुरुवारी संध्याकाळी अज्ञातांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान या घटनेच्या आधी भाजपच्या(bjp) दक्षिण कन्नड युवा मोर्चा समितीचे सदस्य प्रवीण नेत्तर(pravin nettar) यांची सुद्धा हत्या झाली होती. या घटनेचे पडसाद शांत होत नाहीत तोवर आणखी एका तरुणाची हत्या झल्याची घटना घडली आहे. या सर्व प्रकरणानंतर शहरात तणावपूर्ण वातावरण आहे. दरम्यान  प्रवीण नेत्तर  यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक सुद्धा केली आहे.  प्रवीण नेत्तर यांच्या हत्तेनंतर पुन्हा घडलेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि कलम १४४ लागू केले आहे.

हे ही वाचा – भाजप कार्यकर्त्याच्या हत्येमुळे कर्नाटकात तणावाचे वातावरण; वर्षपूर्तीचे कार्यक्रम मुख्यमंत्र्यांकडून रद्द

- Advertisement -

दरम्यान या सगळ्या प्रकारावर मंगळुरुचे(manglore) पोलीस आयुक्त एन शशी कुमार यांनी प्रतिक्रिया देत सांगितले, ‘गुरुवारी २८ जुलै रोजी रात्री ८ च्या सुमारास एका २३ वर्षीय तरुणावर चार ते पाच अज्ञातांनी हल्ला केला. ज्याच्यावर हल्ला झाला त्या तरुणाला तातडीने दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला’ होता.

हे ही वाचा – तृणमूलचे ३८ आमदार भाजपच्या संपर्कात; मिथुन चक्रवर्तींनी पत्रकार परिषदेत केला दावा

- Advertisement -

मंगळुरुचे पोलीस आयुक्त एन शशी कुमार पुढे असंही म्हणाले, ‘धारदार शास्त्राने तरुणांनाही हल्ला केला होता. या प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर सुरथकलमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

आयुक्तालय हद्दीतील सर्व दारुची दुकानं २९ जुलैला बंद असणार आहेत. ‘आयुक्तालय हद्दीतील सर्व दारुची दुकानं २९ जुलैला बंद असणार आहेत त्याचबरोबर  नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असा आवाहन सुद्धा केलं आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा – मनोहर जोशी, लीलाधर डाकेंकडून मुख्यमंत्र्यांनी निष्ठा शिकून घ्यावी, शिंदेंना राऊतांचा सल्ला

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -