घरट्रेंडिंगपर्यावरणपूरक गणेशमूर्तीसाठी समिती गठीत

पर्यावरणपूरक गणेशमूर्तीसाठी समिती गठीत

Subscribe

गणेश विसर्जनानंतर समुद्र, नद्या आणि तळ्यांमधील प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा पर्याय सूचवण्यासाठी नव्या सरकारने सहा तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेश विसर्जनानंतर समुद्र, नद्या आणि तळ्यांमधील प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा पर्याय सूचवण्यासाठी नव्या सरकारने सहा तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. (Committee formed for environment-friendly Ganesha idol)

सर्वोच्य न्यायालय आणि हरित लवादाचे आदेश तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

गणेशमूर्तींचे पाण्यात विसर्जन केल्यानंतर नैसर्गिक जलस्त्रोत प्रदूषित होणार नाही या दृष्टीने अहवाल सादर होणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती तयार करताना पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची शक्यता पडताळून पाहणे, गणेशमूर्तींसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी पर्यावरणपूरक पर्याय सूचवणे आणि गणेमूर्तींच्या विसर्जनानंतर नैसर्गिक जलस्त्रोत प्रदूषित होणार नाही यासाठी सूचना करण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे.

या समितीवर होणारा खर्च महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर सोपवण्यात आला आहे. तीन महिन्यात ही समिती अहवाल सादर करील असे पत्रकात नमूद केले आहे. यंदाच्या गणेशोत्सवाला ३१ ऑगस्टपासून सुरवात होणार आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवानंतर अहवाल सादर होईल.

- Advertisement -

हेही वाचा – 12 जणांचं कॅबिनेट नसतानाही शिंदे सरकारने 32 दिवसांत काढले 752 जीआर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -