घरठाणेगोविंदा पथकांचा विमा महापालिकांनी उतरवावा; मनसेची 'ठामपा' आयुक्तांकडे मागणी

गोविंदा पथकांचा विमा महापालिकांनी उतरवावा; मनसेची ‘ठामपा’ आयुक्तांकडे मागणी

Subscribe

वसई - विरार महापालिकेने त्यांच्या हद्दीतील गोविंदा पथकांचा अपघाती विमा उतरवला आहे. त्या धर्तीवर,ठाणे महापालिकनेही शहरातील गोविंदा पथकाचा अपघाती विमा उतरवावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठामपा आयुक्त विपीन शर्मा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

वसई – विरार महापालिकेने त्यांच्या हद्दीतील गोविंदा पथकांचा अपघाती विमा उतरवला आहे. त्या धर्तीवर,ठाणे महापालिकनेही शहरातील गोविंदा पथकाचा अपघाती विमा उतरवावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठामपा आयुक्त विपीन शर्मा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच, मुंबई,नवी मुंबई महापालिकासोबत राज्यातील सर्व बड्या महापालिकानी पुढाकार घेऊन अशा प्रकारे गोविंदा पथकांचा विमा उतरवावा, असेही मनसेचे म्हणणे आहे. (Govinda mandal should be insured by municipalities MNS demand to TMC commissioner)

कोरोनाचे सावट सरल्याने यंदा सरकारने सर्व उत्सव निर्बंधमुक्त केले आहेत. या पार्श्वभूमीवर दहीहंडीची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या ‘ठाणे’ नगरीलाही दहीहंडीचे वेध लागले संमान. यंदा १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या दहीहंडीसाठी गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहचला असुन गोविंदा मंडळांचा सरावही जोमाने सुरु आहे. कोरोना काळात दोन वर्ष गणेशोत्सव आणि दहीहंडी सारख्या सार्वजनिक सणांवर आलेल्या निर्बंधामुळे मराठी मनावर मरगळ आली होती. परंतु यावर्षी मात्र सर्व सण जोषात साजरा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याने गणेश भक्त आणि गोविंदांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

या अनुषंगाने यंदा दहीहंडी उत्सवाकरीता वसई विरार महापालिकेने घेतलेल्या एका निर्णयाने गोविंदा सुखावले आहेत. वसई विरार महापालिकेने आपल्या मनपा क्षेत्रातील सर्व गोविंदांचा अपघाती विमा उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे मनसेने स्वागत केले असुन ठाण्यात देखील अनेक गोविंदा पथके आहेत,याच धर्तीवर ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी एक पाऊल पुढे टाकत गोविंदा पथकातील बाळगोपाळांचे विमा उतरवावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

किंबहुना, वसई विरारच का, ठाणे, मुंबई, नवी मुंबईसह महाराष्ट्रातील सर्वच महापालिकानी गोविंदाचे विमे उतरविले पाहिजेत. या आधी जायबंदी झालेल्या गोविंदाच्या औषधोपचाराचा सर्व खर्च शासनाने करावा, तर दहीहंडी हा सण आता महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून त्याला आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त झाले असल्याने पालिका प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत या सणात खारीचा वाटा उचलाव, असेही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – काच फोडायची हे मर्दानगीचे लक्षण नाही, रामदास कदमांचा सुभाष देसाईंवर निशाणा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -