घरमहाराष्ट्रस्वत:च्याच 'त्या' भविष्यवाणीला दिली तिलांजली; मिटकरींची फडणवीसांवर टीका

स्वत:च्याच ‘त्या’ भविष्यवाणीला दिली तिलांजली; मिटकरींची फडणवीसांवर टीका

Subscribe

तसेच हिंदुत्त्त्वासाठी सर्वस्व त्याग करुन एकत्र आलेल्या या मंत्रिमंडळाला शुभेच्छा देताना एवढचं म्हणेल, काय ते मंत्री, काय ते मंत्रीमंडळ अन् काय ते हिंदुत्व असा टोलाही त्यांनी लगावला.

एक महिन्याच्या प्रतिक्षेनंतर शिंदे – फडणवीस सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांसह विरोधकांकडूनही टीका करण्यात आली, यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मंत्रीमंडळातील ज्या महान मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. ते बघता देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्याच भविष्यवाणीला तिलांजली दिली आहे. अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

अमोल मिटकरी काय म्हणाले?

शिंदे – फडणवीस सरकारचा विस्तार झाला. या विस्तारात मंगलप्रभात लोढा, तानाजी सावंत आणि इतर 18 महान मंत्र्यांनी शपथ घेतली. हे सरकार किती काळ टिकेल हे काळचं ठरवेल, मात्र काही दिवसांपूर्वी ज्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. त्यांना मंत्रिमंडळात स्थान नसेल अशी भविष्यवाणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तुर्तास त्या भविष्यवाणीला तिलांजली मिळाली आहे. अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

- Advertisement -

तसेच हिंदुत्त्त्वासाठी सर्वस्व त्याग करुन एकत्र आलेल्या या मंत्रिमंडळाला शुभेच्छा देताना एवढचं म्हणेल, काय ते मंत्री, काय ते मंत्रीमंडळ अन् काय ते हिंदुत्व असा टोलाही त्यांनी लगावला.

काल मंत्रिमंडळ विस्तारानंतर अमोल मिटकरी यांनी ट्विट करत शिंदे फडणवीस सरकावर निशाणा साधला. हिंदुत्वासाठी औट घटकेचं ओढूनतोडून स्थापन झालेल्या शिंदे सरकारमधील प्रथम श्रेणी कॅबिनेट मंत्र्यांना कट्टर धर्म रक्षणाच्या शुभेच्छा,” असे मिटकरींनी म्हटले होते. त्याचप्रमाणे याच ट्विटमध्ये त्यांनी, “ज्यांना यात स्थान मिळालं नाही त्यांनी त्यांचे खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिवस’ आलेले आहेत असे समजावे,” अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : …तर कायदा मोडण्याचे अधिकार आम्हाला, केंद्रीय मंत्री गडकरींचे वक्तव्य


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -