घरमहाराष्ट्रपुणेभुईबावडा घाटात दरड कोसळली, गगनबावड्यातून घाट वाहतुकीसाठी बंद

भुईबावडा घाटात दरड कोसळली, गगनबावड्यातून घाट वाहतुकीसाठी बंद

Subscribe

भुईबावडा घाटात दरड कोसळली आहे, यामुळे गगनबावड्यातून घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

कोल्हापूर – जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी तालुक्यामध्ये पाऊस सुरू आहे. सकाळी शाहूवाडी तालुक्यातील करंजफेणमध्ये भूस्खलनाची घटना घडली. यानंतर भुईबावडा घाटामध्ये दरड कोसळून रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे गगनबावडा चौकात बॅरिकेड्स लावून वाहतुक बंद करण्यात आली आहे.  दरम्यान, करुळ घाटातून हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरु आहे. यासंदर्भात गगनबावडा पोलीस ठाण्याकडून माहिती देण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दरड कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. आज सकाळी शाहूवाडी तालुक्यातील करंजफेणमध्ये भूस्खलन झाले होते. मात्र, दोन तासांमध्ये प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला होता. त्यामुळे आता त्या मार्गावरून वाहतूक पूर्ववत झाली आहे.

- Advertisement -

कोल्हापूर जिल्ह्यातील बंद मार्ग –

कोल्हापूर-वैभववाडी

- Advertisement -

कोल्हापूर-रत्नागिरी

राज्यमार्ग –

कोल्हापूर-परिते-गारगोटी-गडहिंग्लज-कोदाळी-भेंडशी, चिखली

वरणगे पाडळी- बाजारभोगाव-अनुस्करा, चंदगड-इब्राहिमपूर

बोरपाडळे-वाठार-वडगाव- हातकणंगले

अतिग्रे -कबनूर- इचलकरंजी-शिरढोण- टाकळी- खिद्रापूर

निढोरी-गोरंबे-कागल-यळगूड-रेंदाळ

एसटी मार्ग –

कोल्हापूर ते गगनबावडा

इचलकरंजी ते कुरुंदवाड

गडहिंग्लज ते ऐनापूर

मलकापूर ते शित्तूर

चंदगड ते दोडामार्ग

गगनबावडा ते करूळ घाट

आजरा ते देवकांडगाव

पंचगंगा 41 फुट 7 इंचांवर –

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचगंगेची पातळी स्थिर आहे. काल (बुधवारी) दुपारपासून पंचगंगेची पातळी 41 फुट 7 इंचांवर पाणी पातळी स्थिर आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फुट आहे. तर धोका पातळी 43 फुटांवर आहे. सध्या पंचगंगा इशारा पातळी वाहत असल्याने धोका लक्षात घेता प्रशासनाकडून आणि कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -