घरमुंबईबोरिवलीतल्या साई बाबानगरमध्ये इमारत दुर्घटना, काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

बोरिवलीतल्या साई बाबानगरमध्ये इमारत दुर्घटना, काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Subscribe

मुंबईः  बोरिवली पश्चिमेकडील साई बाबानगरमध्ये गीतांजली नावाची चार मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचल्या असून, बचावकार्य सुरू करण्यात आले आहेत. या दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्यात 15 ते 20  अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षे जुन्या या इमारतीत काही लोकं राहत असल्याची माहिती समोर येत आहे. या इमारतीमध्ये 12 ते 15 फ्लॅट होते अशी माहिती आहे. ही जुनी इमारत दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास अचानक कोसळली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पश्चिममधील साईबाबा नगरमध्ये 4 मजली इमारत कोसळली आहे. गीतांजली असे या इमारतीचे नाव असून ही इमारत फार जुनी आहे. सध्या अग्निशमन दलाचे कर्मचारी तेथे पोहचले आहे. या इमारतीमध्ये काही कुटुंब राहत होते. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान अग्निशमन दलाचे 8 फायर इंजिन, 2 रेस्क्यू व्हॅन, 1 क्यूआरव्ही, 1 कमांड पोस्ट वाहन आणि तीन रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचल्या आहेत.

सदर इमारत धोकादायक असल्याने रिकामी करण्यात आली होती. मात्र या कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यात कोणी अडकले आहे का, याचा अग्निशमन दलाकडून शोध सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, बोरिवली (पश्चिम), साईबाबा नगर येथील तळमजला अधिक चार मजली ‘गीतांजली’ ही जुनी इमारत दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास अचानक कोसळली. ही इमारत जुनी व धोकादायक असल्याने पालिकेच्या आर / मध्य विभाग कार्यालयातर्फे इमारत खाली करण्याबाबत अगोदरच नोटीस बजावण्यात आली होती.

- Advertisement -

त्यानुसार सदर इमारत रिकामी करण्यात आली होती, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी, पोलीस व अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य कार्य युद्धपातळीवर हाती घेतले आहे.तसेच, पालिका विभाग कार्यालयामार्फतही घटनास्थळी अधिकारी व कर्मचारी यांनी बचावकार्यासाठी धाव घेतली आहे.

गीतांजली ही धोकादायक इमारत कोसळतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये सदर इमारत कोसळण्यापूर्वी संपूर्ण इमारत व इमारतीच्या खिडक्या, काचा हालत असल्याचे पाहताच इमारतीसमोरील रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली होती. तर रस्त्यावरून ये – जा करणारी वाहनेही थांबत थांबत त्या कोसळण्याच्या स्थितीत आलेल्या इमारतीकडे एक क्षण पाहत पुढे मार्गस्थ होत होती. मात्र जेव्हा एका क्षणात इमारत डोळ्यांदेखत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली तेव्हा मात्र रस्त्यावर उभ्या महिला, मुले, नागरिकांनी घाबरून आरडाओरड करीत व स्वतःला वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. गीतांजली इमारत संपूर्णपणे कोसळताच इमारतीच्या ढिगाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ पसरली. सुदैवाने या इमारत दुर्घटनेत इमारतीचा ढिगारा थेट रस्त्यावर पडला नाही. अन्यथा रस्त्यावरून ये – जा करणाऱ्या वाहनांचे नुकसान झाले असते अथवा पादचारी जखमी झाले असते.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -