घरताज्या घडामोडीचाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवानिमित्त एसटीच्या जादा बसेस

चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवानिमित्त एसटीच्या जादा बसेस

Subscribe

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. मागील दोन वर्षांत कोरोना रुग्णांच्या संख्येनंतर एसटीबाबत महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. यंदाचा गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरा होणार आहे. मुंबई, ठाण्यासह अनेक कोकणवासिय गणेशोत्सवात गावी जाणार आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाकडून गणेशोत्सवानिमित्त 2310 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

एसटी महामंडळाकडून 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत जादा बसेस चालवण्यात येणार आहेत. वैयक्तिक आरक्षण करणाऱ्यांसाठी 872 बसेस असणार आहेत. तर ग्रुप आरक्षणासाठी मुंबई विभागातून 667, पालघर विभागातून 313 आणि ठाणे विभागातून 288 बसेस असणार आहेत.

- Advertisement -

रेल्वे प्रवासात अडचणी निर्माण झाल्यास कोकणातील प्रमूख स्थानकात 100 अतिरिक्त गाड्यांचं नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. अतिवृष्टीमुळे कोकणातील खराब रस्ते, टायर पंक्चर होण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे एसटी महामंडळाने मुंबई-गोवा महामार्गावरील आगार आणि दुरुस्ती पथकामध्ये 10 अतिरिक्त टायर ठेवण्याची सूचना महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जादा बसेस असणारे बसस्थानकं कोणती?

– परळ आगार : सेनापती बापट मार्ग दादर, मांगल्य हॉल जोगेश्वरी

- Advertisement -

– मुंबई सेंट्रल आगार : मुंबई सेंट्रल साईबाबा, काळाचौकी, गिरगांव, कफ परेड, केनेडी ब्रीज, काळबादेवी, महालक्ष्मी

– ठाणे 1 आगार: भाईंदर, लोकमान्य नगर, श्री नगर, विटावा, नॅन्सी कॉलनी (बोरिवली)

– ठाणे 2 आगार: भांडूप (पश्चिम) व (पूर्व), मुलुंड (पूर्व)

– कल्याण आगार: कल्याण डोंबिवली (पश्चिम) व (पूर्व)

– पनवेल आगार : पनवेल आगार

– वसई आगार: वसई आगार


हेही वाचा : कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पुढील ३ दिवस मुसळधार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -