घरठाणेमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात रुग्णांना मिळणार 'लेझर' शस्त्रक्रिया' उपचार; महिन्याभरात 12 शस्त्रक्रिया यशस्वी

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात रुग्णांना मिळणार ‘लेझर’ शस्त्रक्रिया’ उपचार; महिन्याभरात 12 शस्त्रक्रिया यशस्वी

Subscribe

जिल्ह्यातील हे पहिलेच शासकीय नाहीतर महापालिका रुग्णालयातीलही ते एकमेव रुग्णालय ठरले आहे. ही किमया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलाश पवार यांनी करून दाखवली आहे.

ठाणे: सध्याच्या युगात वैद्यकीय उपचारात घेण्यासाठी अनेक आधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. अशातच फक्त खासगीच रुग्णालयात लेझर शस्त्रक्रिया केली जाते असं नाही तर लेझर शत्रक्रिया ही आता शासकीय रुग्णालयात सुद्धा उपलब्ध असणार आहे. याचा शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जे रुग्ण येतात त्यांना याचा फायदा होणार आहे. कारण ठाणे जिल्हा (सामान्य) शासकीय रुग्णालयातच आता ही लेझर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली जात आहे. त्यामुळे गोरगरिबांना रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया एक वरदानदायकच ठरणार आहे. त्यातच, अशाप्रकारे जिल्ह्यातील हे पहिलेच शासकीय नाहीतर महापालिका रुग्णालयातीलही ते एकमेव रुग्णालय ठरले आहे. ही किमया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलाश पवार यांनी करून दाखवली आहे.

हे ही वाचा – ठाण्यात गणेशोत्सवासाठी मोकळा ठेवलेला भूखंड भूमाफियाने लाटला, पालिकेकडून करआकारणी सुरूच

- Advertisement -

जिल्ह्यातील गोरगरिब रुग्णांना योग्य आणि वेळेत औषधोचार मिळावे, यासाठी ठाणे जिल्हा (शासकीय) सामान्य रुग्णालय प्रशासन नेहमीच तत्पर्य असते. आता या रुग्णालयाने आणखी एक धाडसी पाऊल टाकले आहे. एकीकडे हे रुग्णालय सुपरस्पेशालिटी रुग्णालय म्हणून नावारूपास येण्याच्या तयारीत असताना, तदपूर्वीच या रुग्णालयात गोरगरीब नागरिकांना अद्यावत पद्धतीचे उपचार मिळण्यास सुरू झाली आहे. त्यामुळे उपचारार्थ रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचा रुग्णालयातील वेळ कमी होईल आणि त्यातच त्या रुग्णाला उपचार घेतल्यानंतर कमीत कमी कालावधीत कामावरही जाता येईल. तसेच रुग्णालयावर येणार रुग्ण संख्येचा ताण ही काम होण्यास मदत होणार आहे. अशीच अद्यावत ‘लेझर’ शस्त्रक्रिया गेल्या महिना ते दीड महिन्यांपासून ठाणे जिल्हा शासकीय (सामान्य) रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे.

हे ही वाचा – शुश्रुषागृह नियमांची अंमलबजावणी न करण्याऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा, आयुक्तांकडे मागणी

- Advertisement -

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलाश पवार यांनी अद्यावत लेझर शस्त्रक्रिया सुरू करता यावी, यासाठी लेझर मशीन घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आणि त्यांना त्यामध्ये यशही आले. त्यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या काही दिवसात ९ लाखांची लेझर मशीन खरेदी करून ती मशीन रुग्णालयात आणण्यात आली. तिला तत्काळ कार्यान्वितही करून शस्त्रक्रियाही सुरू केल्या आहे. गेल्या एक ते दीड महिन्यात फिशर, मूळव्याध आणि भंगदर या प्रकारच्या बारा लेझर शस्त्रक्रिया पार पडल्या. त्यातच चिरफाड न होता आणि शस्त्रक्रिया झाल्यावर अवघ्या काही दिवसातच कामावर किंवा इतरही कामे करता येत असल्याने शस्त्रक्रिया झालेले रुग्णही आनंदात घरी गेले. याच बरोबर त्यांनी डॉक्टरांचे सुद्धा आभार मानले.

हे ही वाचा – आनंद दिघेंबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक, दिला आठवणींना उजाळा

”याबाबत फलक लावण्यात येणार असून त्याद्वारे लेझर शस्त्रक्रियेबाबत माहिती दिली जाणार आहे. पण, रुग्णालयात लेझरद्वारे शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, या शस्त्रक्रियेमुळे रक्तस्राव होण्याची शक्यता फार कमी असते. तर या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या काही दिवसात कामावरही जाता येते.”असं ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाचे डॉ. निशिकांत रोकडे म्हणाले. त्याचबरोबर ” गोरगरीब नागरिकांना अद्यावत सुविधांबरोबर चांगले उपचार मिळावे, यासाठी धडपड सुरू आहे. त्यातून लेझर मशीन घेऊन लेझर शस्त्रक्रिया रुग्णालयात सुरू झाल्या आहेत. लवकर हे रुग्णालय सुपर स्पेशालिटी रुग्णालय होईल. जेवढ्या जास्तीत जास्त अद्यावत सेवा देता येतील तितक्या देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. “- अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांनी दिली.

हे ही वाचा – टेंभीनाक्यावर उद्धव ठाकरेंविरोधात बॅनरबाजी; बाळासाहेबांचा फोटो लावून मविआवर निशाणा

Edited By – Nidhi Pednekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -