घरअर्थजगतएनडीटीव्हीतील 29.18 टक्के हिस्सेदारी अदानी समूह करणार खरेदी

एनडीटीव्हीतील 29.18 टक्के हिस्सेदारी अदानी समूह करणार खरेदी

Subscribe

नवी दिल्ली : एनडीटीव्हीमधील (न्यू दिल्ली टेलिव्हिजन) 29.18 टक्के हिस्सेदारी अदानी समूह खरेदी करणार आहे. या समूहातील एएमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेड (एएमएनएल) या मीडिया कंपनीची माध्यमातून हा सौदा होणार असून ओपन ऑफरतर्फे 26 टक्के हिस्सेदारी देखील खरेदी करणार आहे. यामुळे अदानी समूह एनडीटीव्हीतील सर्वात मोठा हिस्सेदार होईल. अदानी मीडिया नेटवर्कचे सीईओ संजय पुगलिया यांनी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली.

- Advertisement -

एएमजी मीडिया नेटवर्क्स ही एडीटीव्हीतील 29.18 टक्के हिस्सा अप्रत्यक्षपणे खरेदी करणार असून 294 रुपये प्रती शेअर या दराने एनडीटीव्हीतील 26 टक्के हिस्सेदारीच्या खरेदीसाठी 493 कोटी रुपयांची ओपन ऑफर सादर केली आहे. एएमजी मीडिया नेटवर्क्स या कपंनीची विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लमिटेडही उपकंपनी आहे. याच्या माध्यमातून ही ऑफर देण्यात येत आहे. त्यानंतर मंगळवारी एनडीटीव्हीच्या शेअरमध्ये पाच टक्क्यांची वाढ होऊन ते 376.55 टक्क्यांवर बंद झाले.

एनडीटीव्ही 24×7, एनडीटीव्ही इंडिया आणि एनडीटीव्ही प्रॉफिट असे एनडीटीव्हीचे तीन प्रमुख राष्ट्रीय चॅनेल आहेत. तसेच एक डिजिटल प्लॅटफॉर्म देखील आहे. एनडीटीव्हीची प्रमोटर ग्रुप कंपनी आरआरपीआरची एनडीटीव्हीमध्ये 29.18 टक्के हिस्सेदारी आहे. माध्यम उद्योगाला पुढे नेण्याच्या दृष्टीने अधिग्रहणाचा हा सौदा मैलाचा दगड ठरेल. एनडीटीव्हीच्या माध्यमातून ताज्या घडामोडी नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी तत्पर आहोत, असे पुगलिया यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, संजय पुगलिया हे पूर्वी ‘दी क्विंट’च्या एडिटोरिएल डायरेक्टर असताना अदानी तसेच उद्योपती मुकेश अंबानी यांच्याविरोधात लिहित होते. अदानी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्ती असल्याचे सांगत त्यांच्यावर टीका करत होते. पण नंतर पुगालिया यांची अदानी एन्टरप्रायझेसमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तसेच ग्रुपच्या नव्या माध्यम उपक्रमामध्ये ‘एडिटर इन चीफ’ म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -