घरदेश-विदेशभारतीय संगीतकार ए. आर. रहमानचा कॅनडात आगळावेगळा सन्मान

भारतीय संगीतकार ए. आर. रहमानचा कॅनडात आगळावेगळा सन्मान

Subscribe

ए. आर. रेहमान. रेहमानने आजपर्यंत सर्वोत्तम गाणी भारतीय सिनेसृष्टीला दिली आहेत. याच भारतीय संगीतकाराचा कॅनडा मध्ये अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला आहे. ही बाब संपूर्ण देशवासीयांसाठीच महत्चाची आणि अभिमानाची आहे. कॅनडा मधील मरखमी शहरात असलेल्या एका रस्त्याचं नामकरण करण्यात आलं आहे.

भारतीय संगीत सृष्टीतील एक महत्वाचं नाव म्हणजे संगीतकार ए. आर. रेहमान. रेहमानने आजपर्यंत सर्वोत्तम गाणी भारतीय सिनेसृष्टीला दिली आहेत. याच भारतीय संगीतकाराचा कॅनडा मध्ये अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला आहे. ही बाब संपूर्ण देशवासीयांसाठीच महत्चाची आणि अभिमानाची आहे. कॅनडा मधील मरखमी शहरात असलेल्या एका रस्त्याचं नामकरण करण्यात आलं आहे. ”अल्ला – रखा रेहमान स्ट्रीट”(allah – rakha rehman street) असं कॅनडा मधील एक रस्त्याचं नाव तिथल्या सरकाने ठेवले आहे. असा अनोख्या पद्धतीने सन्मान करत भारतीय संगीतसम्राटाला मनाचा मुजरा करण्यात आला आहे.

हे ही वाचा –  एक पुरस्कार दोन नामांकने; आलियाच्या कोणत्या चित्रपटाची होणार ऑस्करसाठी निवड?

- Advertisement -

भारतीय(india) चित्रपट सृष्टीच्या शतक महोत्सवाचं औचित्य साधून कॅनडामधील सर्वात मोठे शहर टोरांटो(toranto) येथे 4 नोव्हेंबरला एका शाही सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मरखममधील एका रस्त्याला भारतीय संगीतकार ए. आर. रेहमान(a. r. rehman) यांचं नाव देण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचाच उर अभिमानाने भरून आला. दरम्यान ए. आर. रेहमान याना आजवर अनेक राष्ट्रीय आई आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पण या सन्मानाने ए. आर. रेहमान सुद्धा भारावून गेला होता. ही बाब भारतासाठी सुद्धा महत्वाची आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – मिस युनिव्हर्स स्पर्धेत आता विवाहित स्त्रियासुद्धा होणार सहभागी; नवीन निर्णयाची अंमलबजावणी

या संदर्भात स्वतः ए. आर. रेहमान(a. r. rehman) याने ट्विट केले आहे आणि ही खुशखबर सर्व देशवासीयांसोबत शेअर केली आहे. मरखममधलाच एक फोटो ए. आर. रेहमानने ट्विटर वर अपलोड केला आहे. त्याला एक सुंदर कॅप्शन सुद्धा दिले आहे. ”वेलकम टू माय स्ट्रीट”! असे कॅप्शन दिले आहे. ए. आर. रेहमानचा अनोखा सन्मान देशवासियांसाठी खूप महत्वाचा आणि अभिमानस्पद आहे. याआधीसुद्धा 2011 मध्ये लंडनमधल्या एका मॅगझीनने ”टुमारोज वर्ल्ड म्युझिक आयकॉन” या यादीत ए. आर. रेहमान याच नाव आवर्जून घेतलं होतं. त्याशिवाय, दोन ऑस्कर पुरस्कार, दोन ग्रॅमी अॅवॉर्ड, एक बाफ्टा अॅवॉर्ड, एक गोल्डन ग्लोब, चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 15 फिल्मफेअर पुरस्कार ए. आर. रेहमानच्या नावावर आहेत.

हे ही वाचा – फिल्मफेअरवर केलेल्या खोट्या आरोपानंतर कंगनाचे नामांकन रद्द

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -