घरठाणेकल्याणमध्ये शिवसेना पक्षनिष्ठेबाबत देखावा; पोलिसांकडून कारवाई करत सामग्री जप्त

कल्याणमध्ये शिवसेना पक्षनिष्ठेबाबत देखावा; पोलिसांकडून कारवाई करत सामग्री जप्त

Subscribe

राज्यभरात आपल्या लाडक्या बाप्पाचे धुमधडाक्यात आगमन होत आहे. यात अनेक मंडळांकडून तब्बल दोन वर्षांनंतर विविध विषयांवर आधारित मोठे देखावे चलचित्र साकारले जात आहे. यात कल्याणमध्येही विजय तरुण मंडळाने यंदा शिवसेनेतील राजकीय घडामोडींवर आधारित देखावा साकारला होता. पक्ष निष्ठा या विषयावर हे देखावा साकारण्यात आला होता. मात्र पोलिसांनी या देखाव्यावर कारवाई करत सामग्री जप्त केली आहे. तसेच मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या मंडळाने पक्षनिष्ठा या विषयावर चलचित्र देखावा साकारला होता. या देखाव्यात शिवसेना पक्ष एका मोठ्या वटवृक्षाच्या रुपात दाखवण्यात आला आहे. या वटवृक्षावर पिकलेली फळं नंतर इतर पक्ष खात असल्याचेही या देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र कल्याण पोलिसांनी या देखाव्यावर आक्षेप घेत आज पहाटेच्या सुमारास कारवाई केली आहे. तसेच देखाव्याचे सर्व सामग्री जप्त केली आहे. या कारवाईविरोधात मंडळाकडून कडाडून विरोध होत आहे. कारवाईबाबत विजय तरुण मंडळाचे विश्वस्त विजय साळवी म्हणाले की, दरवर्षी मंडळातर्फे महत्त्वाच्या घडामोडींवर आधारीत देखावा साकारला जातो. त्यामुळे यंदाच्या देखाव्यातही काहीच आक्षेपार्ह नव्हते. तरी आज पहाटेच्या सुमारास कल्याण पोलिसांनी देखाव्यावर कारवाई केली आहे. ही हिटरशाई असून आम्ही या कारवाईविरोधात न्यायालयात दाद मागणार असून कारवाईचा तीव्र निषेध करतो. तसेच या कारवाईचा निषेध म्हणून आम्ही यंदा गणेश मूर्तीची स्थापना करणार नसल्याचेही साळवी यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

कल्याणमधील विजय तरुण मित्र मंडळ गेल्या 59 वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करत आहे. दरवर्षी या मंडळाकडून राज्यातील देशातील महत्त्वाच्या घडामोडींवर आधारित देखावा साकारला जातो, यंदा राज्यातील सत्तांतरण आणि शिवसेनेतील फूट या महत्त्वाच्या राजकीय विषयावर देखावा साकारण्यात आला होता. पक्षनिष्ठा असा या देखाव्याचा विषय होता. मात्र पोलिसांनी देखाव्यावर आक्षेप घेत देखावा जप्त केला आहे. आज पहाटेच्या सुमारास कल्याण पोलिसांच्या पथकाने ही कारवाई करत मंडळाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान याबाबत मंडळाचे विश्वस्त आणि शिवसेना महानगर प्रमुख विजय साळवी म्हणाले की, ही एक प्रकारे हिटलरशाही असून आम्ही याचा निषेध करतो. मंडळाने देखाव्यात काहीही वादग्रस्त दाखवले नव्हते, राज्यातील एका महत्त्वाच्या आणि ताज्या विषयावर भाष्य करणारा हा देखावा होता. मात्र तरी देखील देखावा जप्त करण्यात आला आहे.


हेही वाचा : महाराष्ट्रातील, देशातील सर्व विघ्न विघ्नहर्त्याने दूर करावेत, देवेंद्र फडणवीसांचं बाप्पाला साकडं

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -