घरठाणेमुंब्र्यात दोन घरांवर दगड कोसळून महिलेचा मृत्यू; दोन्ही घरांचे नुकसान

मुंब्र्यात दोन घरांवर दगड कोसळून महिलेचा मृत्यू; दोन्ही घरांचे नुकसान

Subscribe

ठाणे: मुंब्रा बायपास रोड लगतच्या डोंगरावरून दगड खालील वसलेल्या साईकृपा चाळीतील सुनिल वानपसारे यांच्या व गजराज सोसायटी या चाळीमधील मारुती सुर्यवंशी यांच्या घरावर कोसळल्याची घटना शुक्रवारी दुपारी ५ वाजून २२ मिनिटांच्या सुमारास समोर आली. या घटनेत कविता सुनिल वानपसरे (३५) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने खालील वस्तीमधील एकूण १४ सदनिका रिकाम्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

मुंब्रा बायपास रोडवरील गावदेवी, मे. लाल किल्ला ढाबा जवळील बाजूच्या डोंगरावरील अंदाजे ४ बाय ३ फूट दगड शुक्रवारी दुपारच्या सुमारास खालील असलेल्या चाळीतील दोन घरांवर कोसळल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी माजी मंत्री तथा कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मुंब्रा प्रभाग समितीचे कार्यालयीन अधिक्षक व कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रतिसादक, वनविभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग (महाराष्ट्र शासन)चे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. तत्काळ मदत करण्याबरोबर घरे खाली करण्यास सुरुवात केली. ज्या घरांवर डोंगरावरून दगड पडले त्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- Advertisement -

तसेच या दुदैवी घटनेत कविता वानपसरे (३५) यांचा मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, येथे पाठविण्यात आला आहे. याशिवाय त्या ठिकाणी डोंगरावरील आणखी काही दगड कोसळण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने खालील वस्तीमधील एकूण १४ सदनिका रिकाम्या करून रहिवाश्यांची राहण्याची व्यवस्था नजीकच्या ठामपाच्या शाळेमध्ये करण्यात आली आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

- Advertisement -

जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट

मुंब्रा बायपासवर आज भूस्खलन झाले. त्यामध्ये एक महिला मृत्यूमूखी पडली. पण, धोका पुढे आहे. हा जवळ-जवळ दोन किमीचा बायपासचा पट्टा एका बाजूला पूर्ण डोंगराने व्यापलेला आहे. तर दुस-या बाजूला संपूर्ण झोपड्या आहेत. ह्या डोंगराची रचना पाहता इथे एकावर एक दगड दिसतात. मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची वाहतूक आहे. त्यामुळे जमीनीला हादरे बसतात. त्या हाद-यांमुळे ह्या डोंगरात असलेले दगड देखील हलतात आणि ते खाली कोसळतात वेळीच जर उपाययोजना केली नाही. तर येणा-या काळात एका मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागेल. तरी याबाबत सरकारने वेळीच उपाययोजना करावी, असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

कुटुंबाला शासनाकडून १० लाखांची आर्थिक मदत

या दुदैवी घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्या कुटुंबाला शासनाकडून १० लाखांची आर्थिक मदत मिळेलच. पण, येथे आणखी धोकादायक स्थिती आहे, त्या डोंगरावर आणखी चार ते पाच दगड आहेत.ते कधीही खाली येतील, ते पहिले हलवले पाहीजेल. त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांशी बोलणार आहे. तसेच याबाबत तातडीने निर्णय घ्यावा लागले. त्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत, याशिवाय या परिसरात ज्या ठिकाणी दगड पडण्याच्या घटना घडतात, तेथे लोणावळ्यात दगड रोखण्यासाठी बायपासवर ज्या प्रमाणे जाळी बसवली आहे. तशी जाळी बसवणे येथेही आवश्यक असल्याचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.


हेही वाचा : शेतकरी पुत्राची कंपनी फोर्ब्सच्या यादीत, शेतमालाची आधुनिक विक्री


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -