घरमहाराष्ट्रखिल्ली उडवू नका; अन्यथा मुश्कील होईल, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना...

खिल्ली उडवू नका; अन्यथा मुश्कील होईल, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना इशारा

Subscribe

मुंबई – आदित्य ठाकरे यांना आमदार होण्यासाठी आम्हाला दोन जणांना विधान परिषद द्यावी लागली. त्यामुळे ते जर वारसदार असतील, तर दोन-दोन वरळीत आमदारकी देण्याची गरजच काय होती? असा सवाल करत पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगळवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. आजपर्यंत एक नेता म्हणून आम्ही त्यांची इज्जत ठेवली आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या वयाची आणि अनुभवाची विनाकारण खिल्ली उडवू नये. नाहीतर आम्ही बोलण्यात इतके कठीण आहोत की त्यांना आम्हाला आवरणे मुश्कील होईल, असा थेट इशाराही त्यांनी दिला.

गुलाबराव पाटील यांनी आज मंत्रालयात येऊन आपल्या दालनातून कामकाजाला सुरुवात केली. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. आदित्य ठाकरेंचे वय ३२ वर्षे आहे आणि मी शिवसेनेत ३५ वर्षापासून काम करतोय. आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार होऊ शकतात, पण ते विचारांचे वारसदार नाहीत. आदित्य ठाकरेंवर किती गुन्हे दाखल झाले आहेत? हे तुम्ही त्यांना विचारू शकता, ते कोणत्या तुरुंगात गेले हेही विचारा, नाहीतर आम्ही त्यांना सांगतो की १०० वेळा आम्ही काय-काय भोगले आहे. कलम ३२०, ३०७, १५६ ब, ११० हे काय असते हे तरी त्यांना माहीत आहेत का?, असा सवाल त्यांनी केला.

- Advertisement -

विधानसभेला निवडून येण्यासाठी तुम्हाला आश्वासने द्यावी लागली. आम्ही खरे वारसदार आहोत, आम्ही पडल्यावरही उभे राहिलो आणि उभे राहिल्यावरही पडलो. शिवसेना हा पक्ष नाही, तो एक विचार आहे. तो विचार आम्ही आमच्या डोक्यात ठेवला आहे. त्यामुळे शिवसेना आमचीच आहे, असेही पाटील म्हणाले.

प्रत्येक गावात पाणीपुरवठा करणार –

- Advertisement -

दरम्यान,राज्यातील प्रत्येक गावात पाण्याचा पुरवठा करण्याचे उद्द‍िष्ट पूर्ण करणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.यापूर्वीही पाणीपुरवठा विभागात काम केल्याचा अनुभव असल्याने ‘हर घर जल, हर घर नल’ हे उद्द‍िष्ट २०२४ पर्यंत पूर्ण करण्यास मदत होणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत राज्याला अपेक्षित असलेले काम पूर्ण करणार असून, ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीस पुरेसे पाणी पुरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -