घरमुंबईअंमली पदार्थांच्या तस्करीत वृद्धांचा सहभाग

अंमली पदार्थांच्या तस्करीत वृद्धांचा सहभाग

Subscribe

कोरेक्स या बंदी असलेल्या औषधाची तस्करी करणार्‍या आझाद मैदान अमली पदार्थविरोधी पथकाने शुक्रवारी कारवाई करून चारजणांना अटक केली. चारही आरोपी वृद्ध असून, त्यामध्ये तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे.कर्नाक बंदर येथील एका बस थांब्याजवळ तीन महिला संशयितरित्या फिरताना पोलिसांना दिसल्या. त्यामुळे आझाद मैदान अंमली पदार्थ पथकाच्या अधिकार्‍यांनी त्यांना ताब्यात घेतले असता, त्यांच्याकडे कोरॅक्स नावाचे बंदी घातलेल्या औषधाच्या बाटल्या आढळल्या. पोलिसांनी औषधाच्या बाटल्या जप्त करून त्यांना ताब्यात घेतले. अटक केलेल्या तिन्ही महिलांचे वय ६० ते ६५ वर्षांदरम्यान आहे. फिरोजा सत्तार शेख, जयलक्ष्मी बायनिवेल अरोंदोदोर, मदिना मेहबुब शेख या महिलांचा समावेश आहे. या कामात त्यांना मदत करणार्‍या टॅक्सीचालकालासुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. मोहनलाल पांडे (वय ६०) असे टॅक्सीचालकाचे नाव आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईत वयोवृद्धाचा समावेश क्वचितच आढळून आला आहे. आरोपींकडून जवळपास ६ लाख ८० हजार रुपयांचे कोरॅक्स नावाचे औषध जप्त करण्यात आले असून, आरोपींना पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती आझाद मैदान अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक संजय भालेराव यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -