घरमहाराष्ट्रशिवतीर्थसाठी शिंदे गट आग्रही, मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली मध्यस्थ याचिका

शिवतीर्थसाठी शिंदे गट आग्रही, मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली मध्यस्थ याचिका

Subscribe

मुंबई – शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याकरता मुंबई पालिकेने शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाला परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत जी-उत्तर विभागाने ही परवानगी नाकारली. मात्र, यावरून आता एकनाथ शिंदे गटाने आता मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहेत. आमदार  तर, याआधीच शिवसेनेनेही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय आता काय निर्णय घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर मुंबई पालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली

- Advertisement -

एकनाथ शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचा दावा सदा सरवणकर यांनी याचिकेत केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला परवानगी  मागण्याचा अधिकार नाही. शिवसेनेतर्फे अनिल देसाई यांनी पालिकेला अर्ज केला होता. अनिल देसाई सध्या कोणत्याच पदावर कार्यरत नाहीत, त्यामुळे त्यांचा अर्ज कसा काय ग्राह्य धरला जाणार, असा प्रश्न या सदा सरवणकर यांच्या याचिकेत विचारण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

- Advertisement -

दसरा मेळावा घेण्यासाठी पालिकेची परवानगी मिळविण्यासाठी २२ ऑगस्ट रोजी पालिकेच्या जी/ उत्तर विभाग कार्यालयाकडे अर्ज सादर केला होता. त्यानंतर शिंदे गटाने ३० ऑगस्ट रोजी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याकरता परवानगी अर्ज जी/ उत्तर विभाग कार्यालयाला सादर केला होता. नंतर शिवसेनेतर्फे पालिकेला दोन वेळा स्मरणपत्रही पाठविण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटातर्फे मिलिंद वैद्य यांनी स्वतः जी/ उत्तर कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांनी पालिका विधी खात्याकडून अभिप्राय मागविला असून तो आल्यानंतर परवानगीबाबत कळविण्यात येईल, असे जुजबी उत्तर देत उद्धव ठाकरे गटाची बोळवण केली होती. मात्र तरीही मिलिंद वैद्य यांनी, पालिकेकडून परवानगी मिळो अथवा न मिळो शिवसेनेचा मेळावा होणार म्हणजे होणारच, मात्र पक्षप्रमुख जेथे सांगतील तेथे हा मेळावा घेण्यात येईल, असे सांगितले होते.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या सभेवर भाजपचा निशाणा; आशिष शेलारांनी ट्विटरद्वारे सेनेवर प्रश्नांचा भडिमार

मात्र आता पालिका जी/ उत्तर विभाग कार्यालयाने पोलिसांच्या हवाल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचे कारण देत दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता शिवसेना उद्धव गटाला व शिंदे गटाला शिवाजी पार्क मैदान पालिकेकडून मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.

शिवसेनेच्या याचिकेवर आज सुनावणी

दरम्यान, शिवाजी पार्कवर परवानगी नाकारण्यात येणार असल्याची कुणकुण लागली होती. त्यामुळे त्यांनी आधीच मुंबई उच्च न्यायालयात शिवाजी पार्कवर परवानगी मिळावी म्हणून याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

शिंदे गटाला बीकेसीवर परवानगी

एकनाथ शिंदे गटाने शिवाजी पार्कसह बीकेसीच्या मैदानासाठी परवानगीचा अर्ज मागितला होता. यावेळी एमएमआरडीएने एकनाथ शिंदे यांना परवानगी दिली आहे. मात्र, शिवसेनेनेही बीकेसीच्या मैदानावर केल्यावर दसरा मेळावा घेण्याकरता अर्ज केला होता. मात्र, त्यांना परवानगी नाकारण्यात आली.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -