घरअर्थजगतगॅस सिलिंडरचे दर ते डिमॅट अकाऊंटसाठी नवा नियम, १ ऑक्टोबरपासून बदलणार 'हे'...

गॅस सिलिंडरचे दर ते डिमॅट अकाऊंटसाठी नवा नियम, १ ऑक्टोबरपासून बदलणार ‘हे’ नियम

Subscribe

सरकारी पेन्शन योजनेपासून डिमॅट अकाऊंटपर्यंत आणि क्रेडिट कार्डपासून ते रिझर्व्ह बँकेच्या नियमांत मोठे बदल करण्यात आले आहेत. १ ऑक्टोबरपासून व्यवहार करताना काय काळजी घ्यायची आणि कोणत्या योजनेत बदल झाले आहेत ते आपण जाणून घेऊयात. 

मुंबई – ऑक्टोबर महिन्यापासून अनेक नवे नियम लागू होणार आहेत. यामुळे तुमच्या खिशावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसंच, सरकारी पेन्शन योजनेपासून डिमॅट अकाऊंटपर्यंत आणि क्रेडिट कार्डपासून ते रिझर्व्ह बँकेच्या नियमांत मोठे बदल करण्यात आले आहेत. १ ऑक्टोबरपासून व्यवहार करताना काय काळजी घ्यायची आणि कोणत्या योजनेत बदल झाले आहेत ते आपण जाणून घेऊयात.

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरांत बदल

- Advertisement -

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकारी ऑईल कंपन्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरांत बदल करतात. सप्टेंबर महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरांत बदल झाला नव्हता. परंतु व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांत बदल झाला होता. व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त झाले होते. त्यामुळे येत्या काळात बरेच सण-उत्सव असल्याने घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांत घट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – घाबरू नका! डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची स्थिती उत्तम; अर्थमंत्र्यांचा दावा

- Advertisement -

क्रेडिट कार्ड पेमेंटचे नियम

१ ऑक्टोबरपासून क्रेडिट कार्ड पेमेंटचे नियम बदलणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्ड-ऑन-फाइल टोकनायजेशन नियम ऑक्टोबरच्या पहिल्या दिवसापासून लागू होणार आहेत. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी RBIने Tokenisation प्रणाली लागू करण्यात येणार आहे.

या नियमानुसार, कार्डच्या बदल्यात टोकन दिले जाणार आहेत. हे टोकन युनिक असतील आणि अनेक कार्डसाठी एकच टोकन वापरता येणार आहे. टोकनायजेशनच्या अंतर्गत विजा, मास्टरकार्ड आणि रुपे कार्डपासून टोकन नंबर दिला जाणार आहे. कार्ड नेटवर्कला टोकन देण्यासाठी आधी बँकेची परवानगीही घ्यावी लागणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, या सुविधेचा लाभ घेण्याकरता ग्राहकांना अतिरिक्त शुल्क भरण्याची गरज नाही.

हेही वाचा – सोन्याच्या किमतीत घसरण सुरूच, 6 महिन्यांत 6000 रुपयांनी स्वस्त, आजचा भाव काय?

अटल पेन्शन योजनेच्या नियमांत बदल

एक ऑक्टोबरपासून अटल पेन्शन योजनेच्या नियमात बदल होणार आहेत. सरकारने नव्या नियमांनुसार इनकम टॅक्स भरणारे वापरकर्ते यापुढे अटल पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. हा नवा निमय १ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होणार आहे.

डिमॅट अकाऊंट लॉग इन प्रणाली

डिमॅट अकाऊंट लॉग इन करण्यासाठी तुम्ही जर २ फॅक्टर ऑथेंटिकेशन अॅक्टिव्ह केलं नसेल तर १ ऑक्टोबरपासून तुम्ही ट्रेडिंग खातं वापरू शकणार नाहीत. एनएसईच्या निर्देशानुसार, डिमॅट खातेधारकाने ऑथेंटिकेशनच्या रुपात बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनचं वापर करावा लागेल. टॅ फॅक्टर लॉग इन अॅक्टिव्ह केल्यानंतर कोणीही आपलं डिमॅट अकाऊंट वापरू शकेल.

हेही वाचा – महाविकास आघाडीच्या ‘उद्योगां’ना चाप, एमआयडीसीच्या भूखंडवाटपाला शिंदे सरकारची स्थगिती

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -