घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात 20 हजार पदांसाठी पोलीस भरती, उपमुख्यमंत्र्यांची नवी घोषणा

महाराष्ट्रात 20 हजार पदांसाठी पोलीस भरती, उपमुख्यमंत्र्यांची नवी घोषणा

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याच्या बैठकीनंतर महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. महाराष्ट्रात 20 हजार पदांसाठी पोलीस भरती करण्यात येणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गेल्या महिन्यात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानसभेत फडणवीसांनी 14 हजार पोलिसांच्या भरतीबाबत घोषणा केली होती. मात्र, आता महिन्याभरानंतर उपमुख्यमंत्र्यांकडून 6 हजार पदांची वाढ करण्यात आली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील हजारो तरूण पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत होते. काही दिवसांपूर्वी स्वत: देवेंद्र फडणवीस यांना तरुणांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. यावेळी सरकारने तत्काळ रिक्त पदांची भरती करावी, अशी मागणी करत नांदेड येथील तरूणांनी फडणवीसांना घेराव घातला होता. त्यानंतर आता सरकारने भरती प्रक्रियेबाबत मोठी घोषणा केली आहे.

- Advertisement -

या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा झाल्यानंतर फडणवीस यांनी पोलीस दलाला सूचना दिल्या आहेत. तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हे सिद्ध होण्याचा दर वाढला पाहिजे, असा आमचा प्रयत्न असणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आपल्या तुरुंगांमध्ये असे अनेक कैदी आहेत. ज्यांचा जामीन मंजूर झाला आहे. मात्र पैसे किंवा कोणी व्यक्ती नसल्यामुळे ते तुरुंगाबाहेर येऊ शकले नाहीत. अशा कैद्यांना तुरुंगाबाहेर जाता यावं, यासाठी आम्ही एनजीओंचीही मदत घेणार आहोत, असंही फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : तुमचे मंत्री सर्वसामान्यांना धमक्या देताहेत त्यांना तुम्ही आवरणार की नाही?, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट सवाल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -