घरट्रेंडिंगमुलाच्या सुरक्षेसाठी आईचा भन्नाट जुगाड; व्हिडीओ शेअर करत हर्ष गोएंकांनीही केलं कौतुक

मुलाच्या सुरक्षेसाठी आईचा भन्नाट जुगाड; व्हिडीओ शेअर करत हर्ष गोएंकांनीही केलं कौतुक

Subscribe

या महिलेचा हा जुगाड नेटकऱ्यांच्या मात्र प्रचंड पसंतीस उताराला आहे. या महिलेने मुलाच्या सुरक्षेचीसुद्धा पुर्ण काळजी घेतले आहे. सोशल मीडियावर तर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

कोणतीही आई आपल्या मुलासाठी काहीही करायला तयार असते. कोणतीही गोष्ट आई साठी अशक्य नसते. आपलं मुलं कोणत्याही त्रासाविना व्यवस्थित राहावं, वाढावं म्हणून प्रत्येक आई प्रयत्न करत असते. आपलं मुल आनंदित राहावं यासाठी प्रत्येक आई प्रयत्न करत असते. आई आणि मुलाचा असाच एक भन्नाट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला तिच्या लहान मुलाला सायकलवरून घेऊन जाताना दिसत आहे. पण तुम्ही म्हणाल यात काय नावीन्य आहे. तर तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

- Advertisement -

हे ही वाचा – 1 नोव्हेंबरला होणार महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपल्या लहान मुलाला व्यवस्थित बसता यावे म्हणून या महिलेने एक भन्नाट युक्ती शोधून काढली आहे. या व्हिडिओमध्ये आपल्या मुलाला सायकलवर व्यवथित बसता यावे म्हणून त्या महिलेने सायकलवर मागे सीट बनवून घेतली आहे. महिलेच्या या भन्नाट युक्तीची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – स्वत:च्या बाळाला बाजूला ठेवायचं आणि दुसऱ्याच्या बाळाला…; मुंडेंचा उल्लेख करत पेडणेकरांचा भाजपाला टोला

या महिलेने सायकलवर प्लास्टिकची खुर्ची बसवून घेऊन सीट बनविली आहे. या महिलेचा हा जुगाड नेटकऱ्यांच्या मात्र प्रचंड पसंतीस उताराला आहे. या महिलेने मुलाच्या सुरक्षेचीसुद्धा पुर्ण काळजी घेतले आहे. सोशल मीडियावर तर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हाच व्हायरल व्हिडीओ पाहून हर्ष गोएंका (harsh goenka) यांनीसुद्धा या महिलेचं कौतुक केलं आहे. त्याच संदर्भातील व्हिडीओ हर्ष गोएंका यांनी सुद्धा त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 14 लाख व्ह्यूजसुद्धा मिळाले आहेत. अनेक जणांनी या व्हिडीओवर ‘आईसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही’ ‘या आईने मुलासाठी सिंहासन तयार केले आहे,’ अशा आशयाच्या कमेंट केल्या आहेत, नेटकऱ्यांनी त्या आईचं खूप कौतुक केलं आहे.

हे ही वाचा – देवेंद्र फडणवीस ‘स्पायडरमॅन’ आहेत का? सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून नाना पटोलेंची टीका

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -