घरमहाराष्ट्रमाजी आमदाराच्या मुलाने मातोश्रीवर जाऊन बांधले शिवबंधन; भाजपाला धुळ्यात धक्का

माजी आमदाराच्या मुलाने मातोश्रीवर जाऊन बांधले शिवबंधन; भाजपाला धुळ्यात धक्का

Subscribe

यशवर्धन यांनी बुधवारी ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले.

शिंदे गटाने भाजप सोबत हातमिळवणी केली दरम्यान आता भाजपचे जेष्ठ नेते आणि धुळ्याचे माजी आमदार आणि धुळे – नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे यांचे पुत्र ॲड. यशवर्धन कदमबांडे (yashvardhan kadambande) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. यशवर्धन यांनी बुधवारी ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांच्या हस्ते शिवबंधन बांधले.

दरम्यान राजवर्धन कदमबांडे हे मागील अनेक वर्षांपासून धुळ्याच्या (dhule) राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. राजवर्धन हे धुळे शहराचे दोन वेळा आमदार राहिले होते तर राष्ट्रवादी या पक्षातून राजवर्धन कदमबांडे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 2019 मध्ये राजवर्धन यांनी राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडत भाजप सोबत हातमिळवणी केली. त्यांचे चिरंजीव यशवर्धन कदमबांडे हे देखील भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी होते. दरम्यान यशवर्धन हे काल मातोश्रीवर (matoshri) असल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगत आहे. छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज म्हणून राजवर्धन कदमबांडे घराण्याला ओळखले जाते. दरम्यान यशवर्धन यांच्या शिवसेना प्रवेशामुळे धुळ्यातील राजकारणाला वगेळी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कोण आहेत यशवर्धन कदमबांडे?

राजवर्धन कदमबांडे छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज म्हणून ओळखले जातात. त्यांचे पुत्र यशवर्धन हे वडिलांसोबत राजकारणात अग्रेसर आहेत. त्यांच्या मध्ये नेतृत्व गन असल्याने भाजप कडून त्यांना मोठी जबाबदारीही देण्यात आली होती. यशवर्धन हे भाजपच्या युवा मोर्च्याचे पदाधिकारी म्हणून काम पाहत होते. धुळे जिह्यातील अनेक युवा कार्यकर्त्यांसोबत यशवर्धन यांचा चांगला संपर्क सुद्धा आहे.

- Advertisement -

दरम्यान यशवर्धन यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येत आहे. यशवर्धन यांनी शिवबंधन बांधल्याने धुळ्यात शिवसेनेला कसा फायदा होणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हे ही वाचा – शिंदे सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तारही लांबणीवर; नाराज आमदारांना यावेळी तरी संधी मिळणार?

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -