घरमहाराष्ट्रहाच का मराठी कलाकारांचा सन्मान...; भाजपच्या कार्यक्रमावरून सचिन अहिरांची शेलारांवर टीका

हाच का मराठी कलाकारांचा सन्मान…; भाजपच्या कार्यक्रमावरून सचिन अहिरांची शेलारांवर टीका

Subscribe

भाजपकडून अलीकडे मराठी सन्मानाचा आपला ‘मराठमोळा दीपोत्सव’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात वरळीतील जांबोरी मैदानात पार पडला. मात्र या कार्यक्रमात भाजपने मराठी कलाकारांचा अपमान केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेना नेते सचिन अहिर यांनी ट्वीटवर भाजपकडून मराठी कलाकारांचा अपमान झाल्याचे म्हटले आहे. राहुल देशपांडे यांच गाणं थांबवत अभिनेता टायगर श्रॉफचा सत्कार करण्यात आल्याचा आरोप सचिन अहिर यांनी केला आहे. (mumbai worli shiv sena leader sachin ahir allegation bjp ashish shelar on bollywood actor tiger shroff honored in at bjp event by stopping singer rahul deshpande song)

सचिन अहिर यांनी याबाबतचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अहिर यांनी म्हटले की, ‘हाच का मराठी कलाकारांचा सन्मान, भाजप आयोजित मराठा सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव जांबोरी मैदान, वरळी येथे…मराठी कलाकारांची चेष्टा…’

- Advertisement -

सचिन अहिर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसतेय की, मराठी संगीतकार राहुल देशपांडे गाणं सादर करत असताना अचानक टायगर श्रॉफ येतो. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक पाच मिनिटांचा ब्रेक घेण्याबाबत घोषणा करतो. यावेळी राहुल देशपांडे सूत्रसंचालकांना सांगतात की, जर ब्रेक घेतला तर पुढे मी गाणं सादर करणार नाही. यावेळी कार्यक्रम आयोजकांबरोबर चर्चा होते, ज्यावेळी राहुल देशपांडे म्हणतात की, 20 मिनिटांमध्ये मी गाणं सादर करेन, त्यानंतर तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करु शकता. पण त्यानंतरही स्टेजवर टायगरचा सत्कार केला जातो.

- Advertisement -

दरम्यान या आरोपांना भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे जावे, त्यांनी पक्षाचं नाव रडकी सेना असं ठेवा, ते स्वत: कोणतेही कार्यक्रमांचे आयोजन करत नाहीत. कार्यक्रमात कोणाचाही अपमान झालेला नाही. मराठी माणसांच्या मराठमोळ्या दीपोत्सवामध्ये बॉलिवूड कलाकरही आहेत. हा मराठी माणसांसाठी अभिमानाचा विषय आहे. अशी प्रतिक्रिया शेलारांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.


वरळीच्या आमदारांना पेग, पेंग्विन अन् पार्टीपुढे काही दिसत नाही; शेलारांची आदित्य ठाकरेंवर जहरी  टीका

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -