घरमनोरंजनप्रथमेश परबला मिळाली रियल लाईफ प्राजू ?...

प्रथमेश परबला मिळाली रियल लाईफ प्राजू ?…

Subscribe

‘टाईमपास १’ या चित्रपटापटातून त्यावेळचा कुमारवयीन अभिनेता प्रथमेश परब चर्चेत आला होता. किशोरवयात खुलत जाणारे प्रेम आणि मनोरंजन याचं मिश्रण या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं होत. चित्रपटाच्या कथेमध्ये आपल्यातला प्रत्येक जण कुठे तरी स्वतःला पाहतोच, म्हणूनच या चित्रपटाने घवघवीत यश संपादन केलं. चित्रपटातील प्राजूच्या नावाचा जप करणाऱ्या दगडूला अंतिमतः प्राजू काही मिळाली नाही. काही दिवसांपूर्वी प्रथमेशचा ‘टाईमपास ३’ आणि ‘टकटक २’ हे दोन चित्रपट एकामागोमाग एक प्रदर्शित झाले आणि प्रथमेश पुन्हा चर्चेत आला. आता या दिवाळीत आणखी एका कारणासाठी प्रथमेश पुन्हा एकदा सोशल मिडीयावर चर्चेत आला आहे.

प्रथमेशने नुकतेच काही फोटो आणि व्हिडीओ त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलवर शेअर केले आणि त्याच्या चाहत्यांमध्ये एकच कुजबुज सुरु झाली , “खरंच प्रथमेशला त्याच्या खऱ्याखुऱ्या जीवनातील प्राजक्ता मिळाली आहे का?… ”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kshitija Ghosalkar (@miles_in_style)

- Advertisement -

प्रथमेशने ऐन दिवाळीत जे काही खास फोटो शेअर केले आहेत, त्यात त्याच्याबरोबर असलेली मुलगी ही त्याची गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलं जात आहे. हे फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. पारंपरिक वेशातील दोघांचे हे रोमँटिक फोटो, ‘कुछ तो बात है… ‘ असा त्याच्या चाहत्यांना विचार करण्यास भाग पाडत आहेत. या फोटोत असलेल्या मुलीचे नाव क्षितिज घोसाळकर असे आहे. ती चित्रपटसृष्टीशी संबंधित असल्याचे तिच्याही सोशल मीडिया प्रोफाइलवरून आढळते. क्षितिजाने ‘इंडियन प्रेमाचा लफडा’ या मराठी चित्रपटातून मनोरंजन सृष्टी मध्ये पदार्पण केले आहे, अशीही माहिती मिळते.

- Advertisement -

प्रथमेशने शेअर केलेल्याया फोटोंसोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये तो म्हणतोय की,”…निमित्त जरी दिवाळीचं असलं तरीदेखील नात्यांचं साजरं होणं महत्वाचं !” त्यावर प्रतिक्रिया म्हणून अनेकांनी प्रश्न विचारला आहे, “दादुस याच आमच्या वहिनीसाहेब का… ?” तर यावर क्षितिजा आणि प्रथमेश दोघांपैकी कुणीही अजून कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. अर्थात हे कोड व्यवस्थित उलगडण्यासाठी चाहत्यांना आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे.


Video : बॉलिवूड निर्मात्याने पत्नीला कारखाली चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -