घरमनोरंजनरितेश आणि जेनेलियाचे "वेड" !

रितेश आणि जेनेलियाचे “वेड” !

Subscribe

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसोझा सोशल मीडियावरील त्यांच्या ‘रिल्स’साठी सातत्याने चर्चेत असतात. मात्र आता सोशल मिडीयावर चर्चा सुरु झालीय ती, त्या दोघांच्या ‘वेड’ची, म्हणजे त्यांच्या आगामी मराठी चित्रपटाची ज्याचे नाव आहे ‘वेड’

नुकतच दोघांनीही त्यांच्या या आगामी चित्रपटाची तारीख आपआपल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर केली आहेत. सोबतच चित्रपटाचे काही पोस्टर्सही प्रदर्शित केले आहेत. रितेश म्हणतोय , ” वेडेपणा करायला मुहूर्त नसतो पण केलेला वेडेपणा एखाद्या मुहूर्तावर जाहिर करायला काय हरकत आहे !… वेड तुमच्यापर्यंत येतंय ३० डिसेंबरला. तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असू द्या.”

- Advertisement -

पोस्टर शेअर करत जेनेलियाने मराठीत लिहिले आहे की, “माझा जन्म महाराष्ट्रातलाच. मी अभिनयाला सुरवात केल्यानंतर हिंदी-तमिळ-तेलगू अशा विविध भाषांमधून चित्रपट केले. तिथे रसिक प्रेक्षकांचं उदंड प्रेम मला मिळालं. रितेशच्या पहिल्या दिग्दर्शनाद्वारे मी मराठी चित्रपटात पदार्पण करतेय. मराठीत काम करतांना मला एक वर्तूळ पूर्ण झाल्यासारखं वाटतंय.”

बऱ्याच वर्षानंतर जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख मराठी चित्रपटातून पुन्हा एकत्र दिसणार आहेत. या व्यतिरिक्त आणखीही महत्वाच्या भूमिका दोघे पार पाडत आहेत. रितेशचे दिग्दर्शन पदार्पण तर, जेनेलियाचे निर्माती म्हणून आगमन होत आहे. या चित्रपटात प्रथमच जेनेलिया मराठीत एका मोठ्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबत जेनेलिया म्हणते,” तुम्ही माझ्यावर मराठीतही तितकेच प्रेम कराल याची मला खात्री आहे.” अर्थातच रितेश-जेनेलियाने हे ‘वेड’ प्रेक्षकांनाही लागेल काय?… हे आपल्याला ३० डिसेंबरलाच कळेल.


प्रथमेश परबला मिळाली रियल लाईफ प्राजू ?…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -