घरताज्या घडामोडीअभिनेत्री जुही चावलाच्या 'त्या' ट्वीटवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'सेलिब्रिटींनी...'

अभिनेत्री जुही चावलाच्या ‘त्या’ ट्वीटवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘सेलिब्रिटींनी…’

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला हिनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील पर्यावरणाबाबत भाष्य केले होते. हवेत पसरलेली दुर्गंधी कुणाच्या लक्षात आली आहे का, अशा सवाल उपस्थित करत जुही चावलाने आपले मत सोशल मीडियावर मांडले होते.

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला हिनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील पर्यावरणाबाबत भाष्य केले होते. हवेत पसरलेली दुर्गंधी कुणाच्या लक्षात आली आहे का, अशा सवाल उपस्थित करत जुही चावलाने आपले मत सोशल मीडियावर मांडले होते. मात्र, जुही चावलाने मुंबईबद्दल केलेल्या या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मला वाटतं कोणत्याही सेलिब्रिटींनी अशाप्रकारची वक्तव्य करू नयेत”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी फडणवीसांच्या जुही चावलाने मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी “मुंबईमध्ये आपण इतके प्रोजेक्ट करत आहोत. मुंबईत मुलभूत सुविधा करत आहोत. मला वाटतं कोणत्याही सेलिब्रिटींनी अशाप्रकारची वक्तव्य करू नयेत”, असे म्हटले.

- Advertisement -

जुही चावलाचे वक्तव्य

“हवेत पसरलेली दुर्गंधी कुणाच्या लक्षात आली आहे का? याआधी अशी दुर्गंधी बांद्रा, वरळीजवळील भागातील खाडीच्या इथून जाताना जाणवायची. आता मात्र ही दुर्गंधी पूर्ण दक्षिण मुंबईत पसरली आहे. या दुर्गंधीमुळे आणि हवेतील प्रदूषणामुळे दिवसेंदिवस आम्हाला गटारात राहत असल्यासारखं वाटत आहे”, असे ट्वीट जुही चावलाने केले होते.

- Advertisement -

जुहीच्या या ट्वीटवर काही लोकांनी तिला ट्रोल केलं तर काहींनी इतर शहरातील प्रदूषणाचे दाखले दिले तर काही लोकांनी जुहीच्या म्हणण्याला दुजोरा दिला. मात्र, जुही चावलाच्या या ट्वीटमुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जुही चावला ही मधले बरेच दिवस चित्रपटसृष्टीपासून लांब होती. पण तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चर्चेत असते. तसेच, पर्यावरणाबाबतही जुही चांगलीच जागरूक असते, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी तिच्याकडून जे होईल ते ती करत असते. मध्यंतरी 5जी टेस्टिंगविरुद्ध बोलल्यानंतर तिची कोर्ट केस चांगलीच चर्चेत आली होती.


हेही वाचा – पंजाबच्या विजयानंतर आपचे लक्ष्य कर्नाटककडे! आप नेत्यांनी मांडले विजयाचे गणित

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -