घरताज्या घडामोडीशिंदे गटात जाण्याआधी गजानन कीर्तिकर यांनी मुलाला सांगितले 'हे' कारण

शिंदे गटात जाण्याआधी गजानन कीर्तिकर यांनी मुलाला सांगितले ‘हे’ कारण

Subscribe

ठाकरे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी शुक्रवारी मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश केला. मात्र, गजानन कीर्तिकर शिंदे गटात गेले असले तरी, अद्याप त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर उद्धव ठाकरेंसोबतच आहे.

ठाकरे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी शुक्रवारी मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश केला. मात्र, गजानन कीर्तिकर शिंदे गटात गेले असले तरी, अद्याप त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर उद्धव ठाकरेंसोबतच आहे. याबाबत अमोल कीर्तिकर यांनी स्वत: आपण आदित्य ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगितले. त्यामुळे येत्या काळात राज्याच्या राजकारणात वडील आणि मुलगा यांच्यातील राजकीय लढत पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज गजानन कीर्तिकर यांना विचारले असात, त्यांनी ‘मी अमोलला सांगितले की मी शिदे गटात चाललोय तुला यायचे असेल तर ये, पण तो नाही बोलला’, असे सांगितले. (Shinde Group Mp Gajanan Kirtikar talk About Son Amol Kirtikar)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षात प्रवेश केल्यानंतर गजानन कीर्तिकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ठाकरे गटातून बाहेर येताना मुला अमोल कीर्तिकर याला कल्पना दिल्याचे सांगितले. यावेळी ते म्हणाले की, “मला दुसरा पर्याय नाही. मी ना मनसे, ना भाजपा, ना राष्ट्रवादीमध्ये जातोय. मी शिवसेनेतच चाललोय. एकनाथ शिंदे हे जर बाळासाहेबांचा विचार घेऊन आणि हिंदूत्वाचा विचार घेऊन जात असतील, मराठी माणसांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी कार्यपद्धती घेऊन पुढे जात असतील तर, त्या शिवसेनेत मला जायचेय, तुला यायचे तर ये… त्यावेळी तो म्हणाला मी आतापर्यंत आदित्य ठाकरेंसोबत काम केले आताही करणार आणि मी नाही येत असे सांगितल्याचे, गजानन कीर्तिकर म्हणाले.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंवर गजानन कीर्तिकरांचे गंभीर आरोप

“मी शिवसेनेत 56 वर्षे आहे. एक निष्ठावंत आणि ज्येष्ठ शिवसेनेचा नेता म्हणून मला ओळखले जाते. पण 2004 साली उद्धव ठाकरे यांनी माझे तिकीट कापण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी उत्तर भारतीय असलेल्या व्ही. के. सिंग हा बिल्डर असून, त्याचा भाऊ रमेश सिंग नावाच्या व्यक्तीला तिकीट देण्यासाठी गुप्तगू सुरू होते. पण बाळासाहेबांनी तसे काही केले नाही, त्यांनी मला चार वेळा तिकीट दिले. 2004 साली माझी उमेदवारी कापण्याचा प्रयत्न केला होता, पण 2009 साली माझी उमेदवारी कापलीच. त्यावेळी माझा पीए असलेला सुनील प्रभू यालासारखे बंगल्यावर बोलवून मी तुला तिकीट देणार आहे, असे सांगत होते. तसेच, गजानन कीर्तिकर याला तिकीट देणार नाही, असे बोलत होते”, असा आरोप गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. तसेच, ‘एवढा मोठा पक्षप्रमुख आणि असा विचार करतो’, असा उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला.

तोंड दाबून बुक्क्यांचा मारा

- Advertisement -

“मी त्यावेळी ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मारा’ या म्हणीनुसार केवळ अपमान सहन करत होतो. पण मी कधीच शिवसेना सोडून गेलो नाही. त्यानंतर 2014 आणि 2019 साली एनडीसोबत असताना एक मंत्रिपद मिळाले होते. तेही अरविंद सावंत यांना दिले. तेव्हा तुमच्या ज्येष्ठ शिवसेना नेता गजानन कीर्तिकर का नाही लक्षात आला. त्यानंतर आमचा पक्ष एनडीएच्या विरोधात गेला. दुसरी संसदेमध्येही विनायक राऊत याला पाठवले. तेव्हाही मला डावलले”, असा आरोपही त्यांनी केला.


हेही वाचा – विवियाना मॉल राडाप्रकरणात जितेंद्र आव्हाडांसह 12 जणांना जामीन मंजूर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -