घरक्राइमऐकावं ते नवलच! जमिनीत भुयार खोदून रेल्वेच्या इंजिनाची चोरी; तिघांना अटक

ऐकावं ते नवलच! जमिनीत भुयार खोदून रेल्वेच्या इंजिनाची चोरी; तिघांना अटक

Subscribe

रेल्वेचे इंजिन चोरल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी जमिनीत भूयार तयार करून रेल्वे इंजिन चोरून नेले. ही घटना बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये घडली आहे.

रेल्वेचे इंजिन चोरल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी जमिनीत भूयार तयार करून रेल्वे इंजिन चोरून नेले. ही घटना बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये घडली आहे. रेल्वेचे इंजिन चोरल्याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. (Bihar railways train engine stolen by thieves copper wire)

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या बरौनीपासून मुजफ्फरपूरपर्यंत चोरट्यांनी जमिनीत बोगदा तयार केला. त्यानंतर चोरट्यांनी रेल्वे डेपोत उभी असलेल्या एका रेल्वेचे इंजिन गायब केले. त्यानंतर चोरट्यांनी रेल्वे इंजिनचे सुटे भाग पोत्यात भरून भंगाराच्या दुकानात नेऊन विकले.

- Advertisement -

चोरट्यांनी रेल्वेचे इंजिन चोरल्याची माहिती मिळताच घटनास्थळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.

इंजिन चोरणाऱ्यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी चोरट्यांकडून इंजिनचे चोरलेले वेगवेगळे भाग हस्तगत केले. त्यानंतर आता रेल्वे प्रशासनाच्या तक्रारीवरून तीन आरोपींना अटक करण्यात आली असून १३ पोती लोखंड जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

- Advertisement -

बिहारमधील बेगुसराय येथे झालेल्या या चोरीप्रकरणी आरपीएफ आणि दक्षता विभागाने संयुक्त कारवाई केली ज्यात भांडी विकणाऱ्या एका दुकानदाराकडून रेल्वे इंजिनच्या काही भागांसह दोघांना अटक करण्यात आली. मुझफ्फरपूर जिल्ह्यातील भगवानपूर येथे भांडी विक्रेत्याच्या दुकानावर छापा टाकून रेल्वे पोलिसांनी या घटनेचा पर्दाफाश केला. आरपीएफने दक्षतेसह या दुकानातून रेल्वे इंजिनचे काही भागही जप्त केले आहेत. चौकशीत हे रेल्वेचे सुटे भाग बरौनीजवळील गरहारा रेल्वे वर्कशॉपमधून चोरल्याचे निष्पन्न झाले.


हेही वाचा – शिंदे सरकारवर कामाख्या देवीचा कोप सरकार लवकरच गडगडणार, राष्ट्रवादी नेत्याचा दावा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -