घरमहाराष्ट्रअंगणवाडी सेविका पुन्हा दोन दिवसीय संपावर जाणार!

अंगणवाडी सेविका पुन्हा दोन दिवसीय संपावर जाणार!

Subscribe

वारंवार मागणी करूनही वाढीव मानधनाबाबत सरकारने कायम आश्वासनापलीकडे काहीच दिले नाही. त्यामुळे नवीन वर्षातील जानेवारी महिन्यात ८ आणि ९ तारखेला अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यामुळे या कालावधित महाराष्ट्रातील सर्व अंगणवाड्या बंद राहणार आहेत.

वाढीव पगार या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका मंगळवारी सकाळपासूनच मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाल्या आहेत. वारंवार मागणी करूनही वाढीव मानधनाबाबत सरकारने कायम आश्वासनापलीकडे काहीच दिले नाही. त्यामुळे नवीन वर्षातील जानेवारी महिन्यात ८ आणि ९ तारखेला अंगणवाडी सेविका संपावर जाणार आहेत. त्यामुळे या कालावधित महाराष्ट्रातील सर्व अंगणवाड्या बंद राहणार आहेत. त्यासोबतच ११,१२ आणि १३ या दिवशी जेलभरो आंदोलन देखील या सेविंकांकडून करण्यात येणार आहे.

‘एकदाच वेतनश्रेणी द्या’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवण्याचे जाहीर केले. पण , १५०० रुपये हे दिलेलं मानधन तुटपुंज्या स्वरुपाचे आहे. त्यामुळे आता मानधन नको, एकदाच वेतनश्रेणी देत किमान १० हजार एवढा पगार द्यावा, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे.

अंगणवाडी सेविका गेल्या कित्येक महिन्यांपासून मानधन वाढीविषयी प्रयत्न करत आहेत. त्यांना ऑक्टोबरमध्येच मानधन वाढ मिळायला पाहिजे होती. पण, अजूनही ही वाढ सरकारने दिली नाही. याबाबत आम्ही मुख्यमंत्री, महिला बाल व कल्याणमंत्री पंकजा मुंडे यांना देखील पत्रव्यवहार केला. पण, दोन महिन्यांत उत्तर मिळालं नाही. जर या आंदोलनात आम्हाला योग्य ते आश्वासन नाही मिळालं तर जानेवारी महिन्यात महाराष्ट्राच्या अंगणवाड्या बंद ठेवण्यात येणार आहे.
-भगवान दवणे, सचिव, अंगणवाडी सेविका संघटना

- Advertisement -

सरकारनं दखल न घेतल्यास ११ ते १३ जानेवारीला राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी जेलभरो आंदोलन करतील. ‘महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती’कडून मुंबईत महामोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात साधारणतः दहा हजार अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी, अंगणवाडी सेविकांना सरकारी सेवेत समाविष्ट करून घ्यावं, सेवासमाप्ती लाभाच्या रकमेत तीन पटीने वाढ करावी, कर्मचाऱ्यांना मासिक पाच हजार रुपये पेन्शन योजना लागू करावी आणि अंगणवाडी केंद्राचे कामासाठी रजिस्टर आणि अहवाल फॉर्म देण्यात यावा, अशा विविध मागण्या कर्मचाऱ्यांकडून केल्या जात आहेत.


हेही वाचा – अंगणवाडी सेविका आझाद मैदानावर पुन्हा धडकणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -