घरमहाराष्ट्रमाझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ, पण मी माफी मागतो; रामदेव बाबांना उपरती

माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ, पण मी माफी मागतो; रामदेव बाबांना उपरती

Subscribe

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने रामदेव बाबा यांना नोटीस पाठवली होती. या नोटीसीत त्यांच्या वक्तव्याचा येत्या दोन दिवसांत खुलासा देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, रामदेव बाबा यांनी खुलासा सादर केला आहे.

मुंबई – माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून वेगळा अर्थ काढण्यात आला, असं म्हणत माझ्या वाक्याने कोणत्याही महिलेचं मन दुखावले असल्यास मी माफी मागतो, असं योगगुरू रामदेव बाबा (Yog Guru Ramdev baba) यांनी म्हटलं आहे. रामदेव बाबा यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याप्रकरणी त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Maharashtra State Commission for women Chairperson Rupali Chakankar) यांनी नोटीस बजावली होती. या नोटीसीली उत्तर देताना त्यांनी माफी मागितली आहे. याबाबत रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून माहिती दिली.

हेही वाचा – …तर महिलांनी काही घातलं नाही तरी छान दिसतात, रामदेव बाबा बरळले

- Advertisement -

महिला साडी आणि सलवार सूटमध्ये छान दिसतात. काही घातलं नाही तरी छान दिसतात, असं वादग्रस्त वक्तव्य योगगुरू रामदेव बाबा यांनी केलं होतं. ठाण्यातील एका कार्यक्रमात अमृता फडणवीस आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात योगगुरू रामदेवबाबाही हजर होते. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

हेही वाचा – बाबा रामदेव यांच्या महिलांबाबतच्या ‘त्या’ वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून दखल

- Advertisement -

महिलांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे रामदेव बाबा यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाने कठोर पावलं उचलली. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने रामदेव बाबा यांना नोटीस पाठवली होती. या नोटीसीत त्यांच्या वक्तव्याचा येत्या दोन दिवसांत खुलासा देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, रामदेव बाबा यांनी खुलासा सादर केला आहे.


काय खुलासा दिला?

भारत सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओसारख्या स्त्री सक्षमीकरणाच्या अनेक योजनांना मी नेहमीच प्रोत्साहन दिलं आहे. तसंच, महिलांच्या सक्षमीकरणासाठी मी विविध सामाजिक संस्थांसोबत कामही करतो. त्यामुळे कोणत्याही महिलेचा अपमान करण्याचा माझा कोणताही मानस नव्हता. ठाण्यात आयोजित केलेला संपूर्ण कार्यक्रम महिला सशक्तीकरणवर आधारित होता. या कार्यक्रमातील काही सेकंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमधील माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मी आई आणि मातृशक्तीचा नेहमीच गौरव केला आहे. माझ्या एक तासाच्या लेक्चरमध्येसुद्धा मातृशक्तीचाच गौरव करण्यात आला आहे. यामध्ये एक शब्द मी वस्त्रांसदर्भात बोललो आहे. याचा अर्थ माझ्यासारख्या साध्या वस्त्रांचा होता. मात्र, तरीही माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी अत्यंत खेद व्यक्त करतो. मी त्या सर्वांची माफी मागू इच्छितो ज्यांचा माझ्यामुळे भावना दुखावल्या गेल्या आहेत, असं रामदेव बाबा यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला दिलेल्या खुलाश्यात म्हटलं आहे.

हेही वाचा – रामदेव बाबांचे ते वक्तव्य योग परंपरेला लांच्छन आणणारे : डॉ. नीलम गोऱ्हे

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -