घरदेश-विदेशधक्कादायक! भारताचे आठ माजी नौसैनिक तीन महिन्यांपासून कतारमध्ये कैदेत

धक्कादायक! भारताचे आठ माजी नौसैनिक तीन महिन्यांपासून कतारमध्ये कैदेत

Subscribe

गेल्या ९० दिवसांपासून भारताचे आठ माजी नौसैनिक कतारमध्ये कैदेत आहेत. भारत सरकारच्या प्रयत्नांनंतरही या अधिकाऱ्यांना भारतात आणण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच, त्यांच्या कोठडीत आता पुन्हा एक महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. मात्र, कोणत्या आरोपाखाली त्यांना कतारमध्ये कैदेत ठेवण्यात आले आहे, याची माहिती अद्यापही सार्वजनिक करण्यात आलेली नाही, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

हेही वाचा – श्रद्धा हत्याकांडाची बिहारमध्ये पुनरावृत्ती, भर बाजारात जिवंत महिलेचे केले तुकडे

- Advertisement -

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने केलेल्या सुनावणीत माजी नौसैनिकांच्या कैदेत एका महिन्याची वाढ झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. माजी नैसैनिक सध्या ज्या कंपनीत कार्यरत आहेत, त्या कंपनीचे अधिकारी या सुनावणीवेळी हजर होते. मात्र, या नौसैनिकांसोबत त्यांची चर्चा होऊ शकली नाही. दरम्यान, ३० दिवसांची वाढ १ डिसेंबरपासून लागू झाली आहे.

भारतीयांच्या आठ माजी नौसिकांना ३० ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आलं होतं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना कैदेत ठेवण्यात आलं. मात्र, त्यांच्यावर कोणत्या आरोपाखाली कारवाई झाली आहे याची माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर सोडण्यात यावे याकरता त्यांच्या नातेवाईकांनी सरकारकडे मागणी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – काश्मीरमध्ये कुरिअरने होतेय दहशतवाद्यांना फंडिंग; पाकिस्तानी संघटनेचा डाव, एसआयएकडून पर्दाफाश

२०१९ मध्ये प्रवासी भारती सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले पूर्णेंदु तिवारी हेसुद्धा कैदेत असलेल्या अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी आहेत. पूर्णेंदू तिवारी यांची बहिण डॉ.मीतू भार्गव यांनी म्हटलं की, आम्हाला अधिक चिंता वाटत आहे. कोणत्या आरोपाखाली माझ्या भावाला अटक केलीय हेसुद्धा कोणी सांगत नाहीय. त्यांना ताब्यात घेतल्यास ९० दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे भारत सरकारने लवकरात लवकर हालचाल केली पाहिजे.

भारतीय नौसेनेतून निवृत्त झालेले अधिकारी-कर्मचारी एका खासगी कंपनीत कार्यरत होते. या कंपनीमार्फत नौसेनेला विविध सेवा पुरवल्या जातात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -