घरमहाराष्ट्रसिंधुदुर्ग विमानतळाच्या 'बॅ. नाथ पै विमानतळ सिंधुदुर्ग' नावास मंजुरी, ठराव केंद्राकडे पाठवणार

सिंधुदुर्ग विमानतळाच्या ‘बॅ. नाथ पै विमानतळ सिंधुदुर्ग’ नावास मंजुरी, ठराव केंद्राकडे पाठवणार

Subscribe

नागपूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला ‘बॅ. नाथ पै विमानतळ, सिंधुदुर्ग’ असे नाव देण्याच्या ठरावास आज विधानपरिषदेत मंजुरी मिळाली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत शासकीय ठराव मांडला. दोन्ही सभागृहांच्या मंजुरीमुळे आता हा ठराव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

सोमवारी विधानसभेत एकमताने याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीच विधानसभेत हा ठराव मांडला. आता दोन्ही सभागृहातील मंजुरीमुळे हा ठराव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

- Advertisement -

या विमानतळ परिसरात बॅ. नाथ पै यांचे जीवन चरित्र पुढीव पिढीला कळावे यासाठी विस्तृत माहितीचे शिलालेख तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे स्मारक बांधून त्यांना गौरविण्यात येईल, असे मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले, ट

बॅरिस्टर नाथ पै हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याचे सुपुत्र होते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात सरकारने त्यांचा केलेला हा सन्मान आहे. नाथ पै यांचे विमानतळाला नाव देण्याची सर्व पक्षांनी मागणी केली होती.

- Advertisement -

या विमानतळास वायुयान नियमानुसार, सिंधुदुर्ग विमानतळ, सिंधुदुर्ग याकरिता आयआरबी सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड यास विमानतळ लायसन सार्वजनिक हितासाठी वापरण्यासाठी देण्यात आले होते.

सिंधुदुर्ग विमानतळाला बॅ.नाथ पै विमानतळ सिंधुदुर्ग करण्याबाबतची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे. या ठरावाच्या वेळी विधानपरिषद सदस्य जयंत पाटील तसेच विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनीही सूचना मांडली आहे.

नाथ पै यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. त्यांना यासाठी अनेकवेळा कारावास भोगावा लागला होता. गोवा मुक्ती संग्रामातही ते अग्रभागी होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी राजापूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधीत्व केले होते. कोकण रेल्वेच्या संकल्पेमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.


सोलापूरच्या ‘या’ जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्याचे विधान परिषदेत निलंबन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -