घरराजकारणजयंत पाटील यांचे निलंबन रद्द करा; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

जयंत पाटील यांचे निलंबन रद्द करा; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

Subscribe

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उद्देशून असंसदीय शब्द वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांच्यावर गेल्या आठवड्यात गुरुवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री  सभागृहात आल्यानंतर यावर चर्चा करून निर्णय करू, असे सांगितले. सरकारकडून निलंबन रद्द करण्याची मागणी मान्य न झाल्याने विरोधी पक्षाने सरकार विरोधात घोषणा देत सभात्याग केला.

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उद्देशून असंसदीय शब्द वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांच्यावर गेल्या आठवड्यात गुरुवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. हे निलंबन हिवाळी अधिवेशनाचा कालावधी संपेपर्यंत असणार आहे. या कालावधीत जयंत पाटील यांना मुंबई आणि नागपूर येथील विधानभवनाच्या आवारात प्रतिबंध करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासानंतर जयंत पाटील यांच्या निलंबनाचा मुद्दा उपस्थित केला. जयंत पाटील अनवधानाने बोलून गेले आणि त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली आहे. तरीही पाटील यांना मोठी शिक्षा देण्यात आली, असे  सांगत पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना कारवाई मागे घेण्यासाठी साकडे घातले.

- Advertisement -

तुम्ही मनात आणले तर निलंबन रद्द होऊ शकते, त्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. तुम्ही मनाचा मोठेपणा आणि दिलदारपणा दाखवा. तुम्ही जयंतरावांना बारकाईने ओळखता, असे सांगत पवार यांनी निलंबन रद्द करण्याचा आग्रह धरला. मात्र, फडणवीस यांच्या आश्वासनाने समाधान न झाल्याने विरोधी पक्षाने सभात्याग केला. प्रश्नोत्तराच्या तासापर्यंत विरोधी पक्षाचा सभात्याग कायम होता.

दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागपूर न्यास प्राधिकरणाचा भूखंड घोटाळा बाहेर आल्यानंतर आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या १५० कोटींच्या घोटाळ्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भांडाफोड केला. आज विधानसभेत गायरान जमिनीबाबत झालेल्या घोटाळ्याचा तपशीलच अजित पवारांनी विधानसभेत मांडला. गायरान जमिनीच्या वाटपात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पदाचा दुरुपयोग केला. जमिनीचे वाटप करत असताना तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पदाचा दुरुपयोग करून सर्व कायदेशीर बाबींचे उल्लंघन केले. याबाबत नागपूर खंडपीठाने गंभीर निरीक्षण नोंदवले. राज्यमंत्र्यांविरोधात प्रथमदर्शनी सबळ पुरावेही उपलब्ध आहेत. जिल्हा कोर्टाचा आदेश माहिती असतानाही महसूल राज्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला, असा आरोप अजित पवारांनी केला.

- Advertisement -

हेही वाचाः सोलापूरच्या ‘या’ जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्याचे विधान परिषदेत निलंबन

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -