घरताज्या घडामोडी११६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्विस बँकेला मोठा झटका, शेअर्सच्या मूल्यात घसरण

११६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्विस बँकेला मोठा झटका, शेअर्सच्या मूल्यात घसरण

Subscribe

११६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्विस बँकेला मोठा झटका बसला आहे. स्विस नॅशनल बँकेला मागील वर्षात १४३ अब्ज डॉलर्सचा वार्षिक तोटा झाला आहे. तसेच शेअर्स आणि बॉण्ड पोर्टफोलिओच्या मूल्यात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळे बाजाराच्या तेजीत मोठी घट झालेली दिसून आली आहे. या प्रकरणाबाबत स्विस नॅशनल बँक ६ मार्च रोजी तपशीलवार आकडेवारी जाहीर करणार आहे.

स्विस बँकेला ८०० अब्ज किंमतीचे स्टॉक्स आणि बॉण्ड्समध्ये १३१ अब्ज फ्रँकचं नुकसान झालं. त्यामुळे जागतिक शेअर बाजारात मंदी आली. तसेच रोखीच्या किंमती देखील मागील वर्षात घसरल्या आहेत. यामुळे स्विस बँकेसह सर्व बँकांनी महागाईचा सामना करण्यासाठी व्याजदर वाढवले. २०२२ मध्ये चेअरमन थॉम जॉर्डन यांनी स्विस चलनवाढ रोखण्यासाठी व्याजदरांमध्ये तीनदा वाढ केली होती, असं विश्लेषकांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

२०२१च्या शेवटी स्विस नॅशनल बँकेचं सोनं १ हजार ४० टन इतकं होतं. तर २०२२ मध्ये बँकेचे ४०० दशलक्ष फ्रँक वाढले. २०२२ मध्ये बँकेला तोटा झाल्यामुळे आता ही बँक केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना नेहमी प्रमाणे पे आऊट करणार नाहीये. मात्र, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँकेचं नुकसान झालं असलं तरीही त्याचा परिणाम बँकेच्या धोरणांवर होणार नाही.

२०२१ मध्ये भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांचा स्विस बँकांमधील पैसा ५० टक्क्यांनी वाढला होता. स्विस बँकेतील भारतीयांचा पैसा १४ वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. बँकांमध्ये भारतीयांचे ३.८३ अब्ज स्विस फ्रँक होते.

- Advertisement -

हेही वाचा : जम्मू-काश्मीरमध्ये गावकरीच देणार अतिरेक्यांना सडेतोड उत्तर, सीआरपीएफकडून प्रशिक्षण


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -