घरमहाराष्ट्रठाकरे गटाला पुन्हा डिवचलं; मोदींच्या दौऱ्यापूर्वी मातोश्रीबाहेर झळकावले शिंदे-फडणवीसांचे मोठे कटआऊट

ठाकरे गटाला पुन्हा डिवचलं; मोदींच्या दौऱ्यापूर्वी मातोश्रीबाहेर झळकावले शिंदे-फडणवीसांचे मोठे कटआऊट

Subscribe

मुंबईत आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. यात भाजपकडून या निवडणूकीतही आपलं वर्चस्व दाखवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: राजकीय मैदानात उतरून काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येत आहेत. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आणि शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर मोदींचा हा पहिला मुंबई दौरा आहे. त्यामुळे मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी भाजप आणि शिंदे गट जय्यत तयारी करत आहे. या दिवशी मोदींच्या हस्ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. पण मोदींच्या दौऱ्यापूर्वी शिंदे फडणवीस सरकारने ठाकरे गटाला डिवचण्याची संधी सोडलेली नाही.

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी भाजप आणि शिंदे गटाने वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. यात शिंदे गटाने आता थेट मातोश्रीच्या अंगणातून उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. शिंदे गटाने मातोश्रीबाहेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कटआऊट लावले आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिंदे, फडणवीस यांच्यासह शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचेही भलेमोठे कटआऊट आहेत.

- Advertisement -

दरम्यान या दौऱ्यातून आता शिंदे गट आणि भाजपने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी मुंबईत वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. यावर एका भाजप नेत्याने म्हटले की, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल आणि प्रलंबित असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षासाठी अनुकल खेळपट्टी तयार करण्यात मदत होईल.

मुंबई महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. ही सत्ता उलथवण्यासाठी शिंदे गट आणि भाजप प्रयत्न करत आहे. गेल्या मार्चमध्ये पालिकेची मुदत संपली आहे. यामुळे मुंबईत लवकरचं आता निवडणुका होणार आहेत. यात मोदींच्या मुंबई दौऱ्यापूर्वी वांद्रे उपनगरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांचे मोठे कटआऊट्स उभे केले आहेत.

- Advertisement -

19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत विविध प्रकल्पांसाठी पायाभरणी करण्यासाठी आणि शहरातील वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणाऱ्या दोन मेट्रो मार्गांचे उद्धाटन करण्यासाठी येत आहे.


हेही वाचा : काँग्रेसची वाताहात, खर्गेंना पत्र लिहित प्रदेशाध्यक्षांविरुद्ध बंडाचा झेंडा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -