घरदेश-विदेशलखनऊमध्ये 4 मजली इमारत कोसळली; अनके जण अडकल्याची भीती, मदतकार्य सुरू

लखनऊमध्ये 4 मजली इमारत कोसळली; अनके जण अडकल्याची भीती, मदतकार्य सुरू

Subscribe

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील वजीर हसन रोडवरील चार मजली इमारत मंगळवारी अचानक कोसळली. या इमारतीत एकूण 12 फ्लॅट होते. त्यामुळे दुर्घटनेनंतर मोठ्या प्रमाणात लोकं ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. ही दुर्घटना घडली त्यावेळी इमारतीच्या खालच्या मजल्यावर दुरुस्तीचे काम सुरु होते. या ढिगाऱ्याखालून आत्तापर्यंत सात जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.

ही इमारत अचानक कोसळलं अशी कोणीच कल्पना केली नव्हती. या घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य वेगाने सुरु आहे.

- Advertisement -

मदतकार्यात गुंतलेल्या बचाव पथकांनी आतापर्यंत तीन मृतदेह आणि दोन जखमींना बाहेर काढले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक हेही घटनास्थळी पोहोचले. मदत आणि बचाव कार्य जोरात सुरू असून जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या अपघाताची उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी माहिती दिली आहे. पाठक म्हणाले की, ही चार मजली इमारत होती, या कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातून आत्तापर्यंत सात जणांना बाहेर काढण्यात आलं आहे, त्यांना उपचारांसाठी आता सिव्हिल हॉस्पीटलमध्ये पाठवण्यात आलं आहे. आता सर्वात मोठं आव्हान या लोकांना वाचवण्याचं आहे. पण ढिगाऱ्याखाली किती लोकं अडकले याचा अंदाज बांधणही कठीण आहे.

- Advertisement -

उपमुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार, या इमारतीत अनके कुटुंब राहत होती, इमारतीच्या तळमजल्यावर बांधकाम सुरु होते. त्यासाठी ड्रिलिंग करण्यात आलं होतं. सायंकाळी हे काम आपल्यानंतर 7 च्या सुमारास ही इमारत कोसळली.


टाटा ट्रस्टमध्ये मोठा बदल! सिद्धार्थ शर्मा नवे सीईओ

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -