घरमनोरंजनबॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चा जलवा; 6 दिवसांत कमावले 'इतके' कोटी

बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चा जलवा; 6 दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ बुधवारी (25 जानेवारी) संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. पठाण चित्रपट पाहून आलेले प्रेक्षक चित्रपटाचं तसेच शाहरुख खानचं कौतुक करत आहेत. अनेकांना ‘पठाण’ चित्रपटाची भुरळ पडली आहे. 6 दिवसात चित्रपटाने करोडोंची कमाई केली असून भारतातील अनेक चित्रपटांना मात देत कमी काळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

6 दिवसात ‘पठाण’ने कमावले इतके कोटी

शाहरुख आणि दीपिकाच्या ‘पठाण’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 52.20 करोडोंची कमाई केली होती तर दुसऱ्या दिवशी 70 कोटी कमावले असून तिसऱ्या दिवशी 34 कोटी कमावले आहेत. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 51.50 कोटी तर पाचव्या दिवशी 58.50 कोटी कमावले. सहाव्या दिवशी 25 कोटी कमावले आहेत. या चित्रपटाने आत्तापर्यंत भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण 300 कोटी कमावले आहेत. जगभरातून या चित्रपटाने 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. मागील अनेक दिवसांपासून हा चित्रपट चर्चेत होता. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगने देखील लाखो तिकीटांची विक्री केली होती.

- Advertisement -

‘पठाण’ देशभरात हाऊसफुल

भारतातील अनेक चित्रपटगृहांबाहेर ‘पठाण’ हाऊलफुल झाल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. तसेच परदेशात देखील रेकॉर्ड बनवायला सुरुवात केली आहे. प्रेक्षक शाहरुखचा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अनेकजण शाहरुख आणि दीपिकाचं कौतुक करत आहेत. दरम्यान, ‘पठाण’ चित्रपट 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. तसेच ‘पठाण’ 100 हून अधिक देशांमध्ये 2500 हून अधिक स्क्रीनवर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगनेही विक्रम केला आहे.


हेही वाचा :

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -