घरअर्थजगतBudget 2023 : भारतीयांचं आरोग्य सुधारणार, सरकारकडून 'हेल्थ स्क्रीनिंग'वर भर

Budget 2023 : भारतीयांचं आरोग्य सुधारणार, सरकारकडून ‘हेल्थ स्क्रीनिंग’वर भर

Subscribe

Health Budget 2023 | नागरिकांचं आयुष्यमान सुधारावं, वेळेत उपचार व्हावेत, दिर्घकाळ टिकणारे आजार होऊ नयेत याकरता नवजात बालकापासून ते वयाच्या ४० पर्यंतच्या नागरिकांचं हेल्थ स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.

Health Budget 2023 | नवी दिल्ली – केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ (Budget 2023) मध्ये आरोग्यासाठीही भरघोस तरतूद केली आहे. यामाध्यमातून ०-४० वयोगटातील नागरिकांचं हेल्थ स्क्रिनिंग (Health Screening) करण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीयांचं आयुष्यमान सुधारण्यास मदत होणार आहे. तसंच, वैद्यकीय महाविद्यालयेही (Medical Colleges) सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

नागरिकांचं आयुष्यमान सुधारावं, वेळेत उपचार व्हावेत, दिर्घकाळ टिकणारे आजार होऊ नयेत याकरता नवजात बालकापासून ते वयाच्या ४० पर्यंतच्या नागरिकांचं हेल्थ स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. यामुळे भारतातील आरोग्याच्या समस्या लवकरात लवकर सुटू शकतील.

- Advertisement -

नवीन नर्सिंग महाविद्यालये

इंडिया@100  आणि अमृत काळ समोर ठेऊन केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 157 नवीन नर्सिंग महाविद्यालांच्या स्थापनेची घोषणा केली. 2014 पासून स्थापन केलेल्या 157 महाविद्यालयांच्या सह-स्थानांवर नवीन महाविद्यालये स्थापन करण्यात येतील.

- Advertisement -

सिकल सेल अ‍ॅनिमिया निर्मूलन मोहीम

निर्मला सीतारामन यांनी सिकल सेल निर्मूलन मोहिमेचा आरंभ केला. या मोहिमेअंतर्गत आदिवासी बहुल क्षेत्रातील 0-40 वयोगटातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांचे समुपदेन करण्यात येणार आहे.

संशोधन आणि विकासासाठी आयसीएमआर प्रयोगशाळा उपलब्ध

वैद्यकीय क्षेत्रात नवोन्मेषाला चालना देण्यासाठी सरकार निवडक आयसीएमआर प्रयोगशाळा खाजगी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना संशोधनासाठी उपलब्ध करुन देणार आहे.

औषधनिर्माण क्षेत्रात संशोधन आणि नवोन्मेष

औषधनिर्माण क्षेत्रात संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी उत्कृष्ट केंद्रांच्या माध्यमातून नवीन कार्यक्रम हाती घेतला जाईल,  अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. “आम्ही उद्योगांना विशिष्ट प्राधान्य क्षेत्रांमध्ये संशोधन आणि विकासासाठी गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करू”, असे अर्थमंत्री म्हणाल्या.

वैद्यकीय उपकरणांसाठी समर्पित बहुशाखीय अभ्यासक्रम

वैद्यकीय क्षेत्रातील भविष्यकालीन वैद्यकीय तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाच्या उत्पादनाचे महत्त्व अधोरेखित करताना अर्थमंत्री सीतारामन यांनी भविष्यकालीन वैद्यकीय तंत्रज्ञान, उच्च दर्जाचे उत्पादन आणि संशोधन यासाठी कुशल मनुष्यबळाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी विद्यमान संस्थांमध्ये वैद्यकीय उपकरणांसाठी समर्पित बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमांची घोषणा केली.

सरकारी योजनांसाठी ‘नो स्ट्रेस’, कारभार होईल ‘पेपरलेस’

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 5G नेटवर्क, I, DIGILocker संदर्भातही मोठ्या घोषणा केल्या आहेत. या डीजी लॉकरमध्ये स्टोर महत्वाची कागदपत्र ही आधार मान्य असणार आहे. यामुळे तुम्हाला एखाद्या सरकारी योजनेसाठी करावी लागणारी केव्हायसी डिजीलॉकरच्या मदतीने पूर्ण करता येणार आहे. तसेच विविध सरकारी योजनांना तुम्हाला वारंवार नव्याने कागदपत्रं सबमिट करण्याची गरज लागणार नाही. यामुळे केंद्र सरकार आता डिजीलॉकर वापराला प्रोत्साहन देणार आहे.

हेही वाचा – Union Budget 2023 : सरकारी योजनांसाठी ‘नो स्ट्रेस’, कारभार होईल ‘पेपरलेस’, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

अर्थमंत्र्यांकडून कर रचनेत मोठा बदल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडत असताना मोठ्या घोषणा केल्यात. 2.5 लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या 6 टप्प्यातील उत्पन्न कर रचनेत बदल करण्यात आला आहे. या व्यवस्थेतील कर रचनेत बदल करत करमुक्त सवलतीची मर्यादा 3 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टॅक्स स्लॅबबाबत मोठी घोषणा केली आहे. आता नव्या करप्रणालीनुसार 7 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तीला कोणताही कर भरावा लागणार नाही. आतापर्यंत ही मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत होती. अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात वैयक्तिक करदात्यांच्या प्राप्तिकर रचनेत वाढ करण्याची घोषणा केली आहे. प्राप्तिकरात आता 5 लाख रुपयांवरून 7 लाख रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. नवीन कर प्रणालीतील लोकांना सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही प्राप्तिकर भरावा लागणार नाही.

हेही वाचा Union Budget 2023 :अर्थमंत्र्यांकडून कर रचनेत मोठा बदल, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -