घरमुंबईमुंबईकरांची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प; गटनेत्यांचा आरोप

मुंबईकरांची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प; गटनेत्यांचा आरोप

Subscribe

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कोणताही महत्वाचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रामुख्याने पुन्हा त्याच योजना पुन्हा अर्थसंकल्पामध्ये दाखवून मुंबईकर जनतेचे नुकसान करण्याचे प्रशासकांचे धोरण यशस्वी झाले आहे, असे दिसून येत आहे. विविध बँकांमध्ये महापालिकेच्या ज्या कोट्यवधी रुपयांच्या मुदत ठेवी आहेत त्यांचा गैरवापर करून मुंबई महापालिकेस कर्जबाजारी करण्याचे नियोजन आहे, असे सदर अर्थसंकल्पातून निदर्शनास येत आहे, असा आरोपही शेख यांनी केला.

 

मुंबईः मुंबई महापालिकेत सद्या लोकशाही मार्गाने निवडून आलेले जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणजेच नगरसेवक नसताना आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प प्रशासकांमार्फत मांडण्यात आला. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे फुगीर आश्वासन देऊन मुंबईकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा आरोप समाज पक्षाचे माजी गटनेता रईस शेख यांनी केला.

- Advertisement -

ते म्हणाले, अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मुंबईकरांना नविन सोयीसुविधा पुरविण्यात येणाच्या दृष्टिकोनातून असणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु सद्यस्थितीत पालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकांमार्फत लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता एवढा मोठा अर्थसंकल्प कमी वेळेत मांडून ऐतिहासिक विक्रम केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेची परंपरा होती की, लोकप्रतिनिधी जनतेच्या गरजेनुसार अर्थसंकल्पामध्ये सुचना करत होते परंतु सदर परंपरा खंडित करण्याचे काम प्रशासकामार्फत करण्यात आले आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कोणताही महत्वाचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रामुख्याने पुन्हा त्याच योजना पुन्हा अर्थसंकल्पामध्ये दाखवून मुंबईकर जनतेचे नुकसान करण्याचे प्रशासकांचे धोरण यशस्वी झाले आहे, असे दिसून येत आहे. विविध बँकांमध्ये महापालिकेच्या ज्या कोट्यवधी रुपयांच्या मुदत ठेवी आहेत त्यांचा गैरवापर करून मुंबई महापालिकेस कर्जबाजारी करण्याचे नियोजन आहे, असे सदर अर्थसंकल्पातून निदर्शनास येत आहे, असा आरोपही शेख यांनी केला.

- Advertisement -

दोन वर्षानंतर मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प तुटीत जाणार : रवी राजा
मुंबई महापालिकेचे विविध बँकांमध्ये मुदतठेवींपोटी ८८ हजार कोटी रुपये जमा आहेत. त्यामधील तब्बल ४० हजार कोटी रुपये हे कंत्राटदारांनी जमा केलेली अनामत रक्कम आहे. त्यामुळे त्यांचे पैसे त्यांना परत द्यावे लागणार आहेत.
तर २५ हजार कोटी रुपये हे पालिका कर्मचारी व अधिकारी यांचे ग्रॅच्युइटी आणि पेंशन पोटी जमा पैसे आहेत. ते त्यांनाही ते निवृत्त झाल्यावर द्यावे लागणार आहेत. त्यामुळे या पैशाला, निधीला कोणालाही हात लावता येणार नाही. या निधीचा कोणीही कोणत्याही कामांसाठी वापर करू शकत नाही. मात्र उर्वरित २० हजार कोटींमधून १५ हजार कोटी रुपये काढण्यात आल्याने केवळ ५ हजार कोटी रुपये राखीव निधीमध्ये शिल्लक राहणार आहेत. आयुक्त स्वतः पालिकेचा महसूल कमी झाल्याचे बोलत आहेत. यावरून येत्या दोन वर्षानंतर पालिकेचा अर्थसंकल्प हा नक्कीच तुटीत जाईल, अशी भीती असल्याचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले.

 

दिशाभूल करणारा अर्थसंकल्प : राखी जाधव
महापालिका आयुक्त चहल यांनी आता प्रशासक म्हणून मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांच्या आदेशाने व त्यांचे ऐकून ठराविक कामे हाती घेत आहेत. सामान्य मुंबईकरांना नेमक्या कोणत्या सेवासुविधा हव्यात हे आयुक्त यांनी एकदा स्वतः बघायला हवे. आज प्रकल्पबाधित हक्काच्या घर व जागेपासून ५ वर्षे वंचित राहत आहेत. केवळ रस्त्यालगतच्या भिंती रंगवून व दुभाजकात झाडे लावून मुंबईचे सुशोभिकरण होत नसते. यंदाचा अर्थसंकल्प हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व श्रीमंतांना खुश करणारा व मुंबईकरांची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प आहे.

मुंबईकरांच्या हिताचा अर्थसंकल्प: प्रभाकर शिंदे
मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, आज सादर केलेला अर्थसंकल्प हा संपूर्ण मुंबईकरांच्या हिताचा आहे. या अर्थसंकल्पात, शहराच्या पायाभूत सुविधांना प्राधान्यक्रम देण्यात आलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे रस्ते आणि आरोग्य सुविधांना चालना देण्यासाठी या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, असा दावा भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -