घरताज्या घडामोडीकाही लोकांना देशाची प्रगती मान्य नाही; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

काही लोकांना देशाची प्रगती मान्य नाही; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चेला आज लोकसभेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेस निशाणा साधला असून, 'निराशेच्या गर्तेत बुडलेल्या काही लोकांना या देशाची प्रगती मान्य नाही. १४० कोटी देशवासीयांचे कष्ट आणि परिश्रम त्यांना दिसत नाहीत', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चेला आज लोकसभेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेस निशाणा साधला असून, ‘निराशेच्या गर्तेत बुडलेल्या काही लोकांना या देशाची प्रगती मान्य नाही. १४० कोटी देशवासीयांचे कष्ट आणि परिश्रम त्यांना दिसत नाहीत’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ‘भारत एक मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून विकसित होत आहे. जगात भारताच्या समृद्धीत भरभराट दिसत आहे’, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. (Some people do not agree with the progress of the country Prime Minister Modi attacks Congress)

“मागील नऊ वर्षांत ९० हजार स्टार्टअप्स भारतात आले असून, आज स्टार्टअप्सच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. देशातील शहरांमध्ये मोठी स्टार्टअप इकोसिस्टम पोहोचली आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.

- Advertisement -

“इतक्या कमी वेळात आणि कोरोनाच्या गंभीर काळात १०८ युनिकॉर्न तयार झाले. युनिकॉर्न म्हणजे सहा-सात हजार कोटींपेक्षा जास्त किंमत. आज भारत मोबाईल बनवणारा जगातील दुसरा सर्वात मोठा देश बनला आहे. देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या बाबतीत आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर आहोत”, असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

“भारताला आज जगातील श्रीमंत देशांच्या G-20 गटाचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली आहे. ही १४० कोटी देशवासीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. पण आधी असे वाटले नव्हते, पण आता असे दिसते की काही लोकांना यामुळे वाईट वाटत आहे. ज्यांना याचा त्रास होत आहे ते कोण आहेत, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे.

- Advertisement -

“आव्हानांशिवाय जीवन घडत नाही, आव्हाने येतात, परंतु १४० कोटी देशवासीयांची भावना आव्हानांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. आव्हानांपेक्षा त्याची ताकद मोठी आणि मजबूत आहे. अनेक देशांमध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे. तीव्र महागाई आहे. खाण्यापिण्याचे संकट आहे. आपल्या आजूबाजूलाही ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा परिस्थितीत कोणता भारतीय अभिमान बाळगणार नाही, की आजही हा देश जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. आज संपूर्ण जगात भारताबद्दल सकारात्मकता आहे”, असेही मोदींनी म्हटले.


हेही वाचा – काही लोकांच्या भाषणातून त्यांची योग्यता समजते; पंतप्रधानांचा राहुल गांधींना टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -