घरमहाराष्ट्रमुंबईत द बर्निंग ट्रेन ! लोकल ट्रेनच्या चाकाला आग, प्रवाशांनी टाकल्या उड्या

मुंबईत द बर्निंग ट्रेन ! लोकल ट्रेनच्या चाकाला आग, प्रवाशांनी टाकल्या उड्या

Subscribe

मुंबईत एक मोठी दुर्घटना टळली आहे. मुंबईत एका लोकल ट्रेनच्या डब्यात आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर रेल्वेच्या डब्याला लागलेली आग पाहून प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी उड्या टाकल्या.

मुंबईत एक मोठी दुर्घटना टळली आहे. मुंबईत एका लोकल ट्रेनच्या डब्यात आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर रेल्वेच्या डब्याला लागलेली आग पाहून प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी उड्या टाकल्या.

आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ कसारा-सीएसएमटी लोकलला अचानक आग लागली. लोकलच्या चाकातून धूर निघू लागला. ते पाहून लोकलला आग लागल्याचं समजून डब्ब्यात असलेल्या प्रवाशांनी लोकल ट्रेनमधून उड्या टाकल्या. या सर्व घटनेची माहिती तिथल्या एका प्रवाशाने आसनगाव स्टेशन मास्तरांना दिली. लोकल ट्रेनमधून उड्या घेऊन खाली उतरून कामावर जायला उशीर नको म्हणून प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवरून पायी चालत आसनगाव स्टेशन गाठलं.

- Advertisement -

या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतू लोकलमधील चाकांच्या ब्रेकमध्ये घर्षण झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. प्रचंड धूर आणि आगीच्या घटनेमुळे ही लोकल आणि डब्ब्यात बसलेल्या प्रवाशांची एकच धावपळ उडाली होती. डब्यातील प्रवाशांनी आपत्कालीन साखळी खेचून गाडी थांबवली. लोकल थांबल्यानंतर प्रवाशांनी लोकलमधून उड्या घेतल्या. प्रवाशांच्या मदतीने चाकाला लागलेल्या छोट्या आगीवर पाणी टाकून ती आटोक्यात आणली. या घटनेमुळे २० मिनिटं गाडी खोळंबळी होती. त्यानंतर ही लोकल कारशेडकडे रवाना झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -