घरताज्या घडामोडीजो ना भगवान राम का, वो ना किसी काम का, आशिष शेलारांचा...

जो ना भगवान राम का, वो ना किसी काम का, आशिष शेलारांचा ठाकरेंना टोला

Subscribe

ज्यांनी राम मंदिर आणि राम सेतूची खिल्ली उडवली त्यांना हिंदी भाषिक समाज ओळखून आहे. हा समाज हे जाणतो की, जो ना भगवान राम का, वो ना किसी काम का, असा टोला भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. तसेच है तय्यार हम्‍ हे अभियान आम्ही हाती घेत असल्याचे सांगितले.

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई कार्यालयात भाजपा मुंबई पदाधिकारी आणि उत्तर भारतीय मोर्चाची बैठक झाली. याबाबत माध्यमांशी बोलताना आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले की, काल संपुर्ण मुंबईत भाजपतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ४१० ‍ठिकाणी साजरी करण्यात आली. अन्य कुठलेही पक्ष या जयंती उत्सवात नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणारेही दिसले नाहीत. या सर्व बाबींसह आगामी काळातील पक्षाच्या कार्यक्रमांचा आढावा व नियोजन आजच्या बैठकीत आम्ही केले, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

त्यांनतर मुंबई भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. याबाबत पत्रकारांनी विचारले असता आशिष शेलार म्हणाले की, ज्यांनी राम मंदिराची चेष्टा केली, राम सेतूची चेष्टा केली ते आज मतांसाठी दारोदार फिरत आहेत. त्यांच्या अहंकारामुळे ही अवस्था त्यांची झाली आहे. कधी उत्तर प्रदेशमध्ये यादवांना जाऊन भेटत आहेत तर कधी बिहारमध्ये जात आहेत, कधी तमिळनाडूमध्ये स्टॅलीन यांना जाऊन भेटत आहेत, तर मुंबईत रमेश दुबे यांना भेटत आहेत.

आज मतांसाठी जोगवा मागण्याची, दारोदार फिरण्याची वेळ का आली. हिंदी भाषिक समाज भाजपा सोबतच आहे आणि तो भाजपा सोबतच राहिल. भाजपाने मुंबईत चौपाल सुरू केले तेव्हापासूनच उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली. त्यामुळे आज ते उत्तर भारतीय समाजाच्या बैठका घेत आहेत पण आम्ही त्यांना सांगतो की, ”है तयार हम!”, तसेच आम्हाला याची कल्पना आहे की, हिंदी भाषिक जाणतात “जो ना भगवान राम का वो ना किसी काम का!”, असा टोला आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना लागावला.

- Advertisement -

हेही वाचा : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी 20 हजार कोटी रुपयांचा निधी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -